Actress Vaidehi Parshurami shared her views on remuneration and money marathi Entertainment news  
Premier

Vaidehi Parshurami : "कोणासाठीही फुकटात काम करू नका": इंडस्ट्रीत येण्यापूर्वी गुरूंच्या सल्ल्याने बदललं वैदेहीचं आयुष्य

Vaidehi Parshurami News : उत्तम अभिनयासोबतच नृत्यांगना म्हणूनही वैदेहीने तिची स्वतःची ओळख बनवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मराठी इंडस्ट्रीतील एक सुंदर अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. उत्तम अभिनयासोबतच नृत्यांगना म्हणूनही वैदेहीने तिची स्वतःची ओळख बनवली आहे. नुकतंच वैदेहीने एका मुलाखतीमध्ये तिचं मानधन आणि पैशांकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन याबाबत तिचं मत शेअर केलं.

वैदेहीने काही दिवसांपूर्वी व्हायफळ युट्युब चॅनेलच्या व्हायफळ गप्पा या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिला तिचं पहिलं मानधन केव्हा मिळालं आणि ती पैसे कसे मॅनेज करते असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली,"मी अभिनयक्षेत्रात येण्याआधीपासून कत्थक शिकतेय. मी आमच्या क्लासतर्फे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी आमच्या मावशींनी (वैदेहीच्या गुरु) मला माझा पहिला चेक दिला. ते माझं पहिलं मानधन होतं आणि ते होतं फक्त पन्नास रुपये. हे त्यांनी दिलं कारण आम्हाला सवय लागावी म्हणून.

त्या आम्हाला कायम सांगायच्या की, कोणतंही काम फुकटात करू नका. तुम्ही एखाद्या ठिकाणी आवड म्हणून सादर केलं तर गोष्ट वेगळी पण तुम्हाला कलाकार म्हणून कुणी बोलावलं असेल तर तुम्ही एक रुपया का होईना पण मानधन जरूर घ्या. कारण फुकट केलेल्या कामाची किंमत राहत नाही.

पुढे मी अभिनयक्षेत्रात आल्यावर माझ्या आई-बाबांनी मला स्वतःहून माझे पैसे मॅनेज करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला माझा स्वभाव खर्चिक होता पण हळूहळू मी मॅनेज करायला शिकले. मला फिरायला आणि खायला खूप आवडतं. मी त्यासाठी पैसे खर्च करते पण आता मी पैसे मॅनेज करायला शिकले आहे. माझ्या बाबांनी माझ्या मनावर एक गोष्ट कायम बिंबवली कि, तुमच्या गरजा इतक्याच ठेवा कि पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध पैशासाठी कोणतंही काम करावं लागणार नाही. ते मी पाळत आले आहे.

शिवाय मला खूप चांगले मित्र भेटले आहेत. माझा एक मित्र सीए आहे. तो कायम मला पैशांबाबत सल्ला देतो. मी व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करतेय का याकडे त्याचं लक्ष असतं. कोव्हिडच्या काळात मी माझ्या खर्चाचा रेकॉर्ड लिहून ठेवायला शिकले. त्याचा मला खूप फायदा झाला. " वैदेहीच्या उत्तराने सगळ्यांची मनं जिंकली.

वैदेहीने 'वेड लावी जीवा' या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं पण तिचा गाजलेला सिनेमा होता 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'. या सिनेमात तिने साकारलेली कांचन घाणेकरांच्या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर सिंबा या बॉलिवूड सिनेमातील तिची भूमिकाही खूप गाजली. आता वैदेही कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT