Vidya Balan on Nepotism in Bollywood 
Premier

Vidya Balan on Nepotism in Bollywood : 'इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही', नेपोटीझमबाबत विद्या बालन थेटच बोलली

Vidya Balan on Nepotism in Bollywood : अभिनेत्री विद्या बालन सध्या तिचा आगामी सिनेमा 'दो और दो प्यार' च्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे

सकाळ वृत्तसेवा

Vidya Balan on Nepotism in Bollywood : अभिनेत्री विद्या बालन सध्या तिचा आगामी सिनेमा 'दो और दो प्यार' च्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच तिने या सिनेमा प्रोमोशनच्या निमित्ताने इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. यावेळी तिने नेपोटीझमवर भाष्य केलं.

तिला नेपोटीझम आणि त्याचा करिअरवर होणार परिणाम याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विद्याने दिलेल्या उत्तराने सगळेचजण थक्क झाले. विद्या तिचं नेपोटीझमवर मत मांडताना म्हणाली, "नेपोटीझम असो वा नसो मी इथे काम करतेय. ही इंडस्ट्री कोणाच्याही बापाच्या मालकीची नाहीये, नाहीतर प्रत्येक बापाचा मुलगा किंवा मुलगी यशस्वी झाले असते. मी आता जे काही काम करतेय त्यात मी खुश आहे. पण काहीवेळा अशी वेळ यायची कि मला वाटायचं त्यावेळी जर मला काही लोकांचा आधार मिळाला असता तर काही गोष्टी अजून चांगल्या घडल्या असत्या. पण संधींच्या बाबतीत म्हणाल तर आतापर्यंत कुणीच माझा वाटा नाकारू शकलं नाहीये." विद्याने व्यक्त केलेलं तिचं हे मत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

विद्याचा 'दो और दो प्यार' हा आगामी सिनेमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेला हा सिनेमा एका जोडप्याची आणि त्यांच्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर सुरु असलेल्या प्रकरणाची गोष्ट सांगतो. प्रतीक गांधी, इलियाना डिक्रुझ, सेंथिल राममूर्ती यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. १९ एप्रिल २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार असून शिरिषा गुहा ठाकुरता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय .

या आधी विद्याचा नियत हा सिनेमा अमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर आता ती अनिस बझमी यांच्या 'भूलभुलैया ३' या सिनेमात काम करत असून या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या सिनेमात ती कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबत काम करणार आहे. प्रतीक गांधीचाही नुकताच 'मडगाव एक्स्प्रेस' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. तर प्रेग्नेंसीनंतर इलियाना पहिल्यांदाच'दो और दो' प्यार या सिनेमातून कमबॅक करतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT