Aditi Rao Hydari And Siddharth esakal
Premier

Aditi Rao Hydari And Siddharth: सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरीनं गुपचूप उरकलं लग्न? तेलंगणातील मंदिरात बांधली लग्नगाठ

Aditi Rao Hydari And Siddharth: सिद्धार्थ आणि अदिती यांनी गुपचूप लग्न केलं आहे, असं म्हटलं जात आहे. या दोघांच्या लग्नाची चर्चा सध्या होत आहे.

priyanka kulkarni

Aditi Rao Hydari And Siddharth: प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. दोघांना अनेकवेळा स्पॉट करण्यात आलं. पण आदिती राव हैदरी किंवा सिद्धार्थ यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही. आता सिद्धार्थ आणि अदिती यांनी गुपचूप लग्न केलं आहे, असं म्हटलं जात आहे. या दोघांच्या लग्नाची चर्चा सध्या होत आहे.

तेलंगणातील मंदिरात बांधली लग्नगाठ

रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि अदितीनं आज (27 मार्च) तेलंगणातील एका मंदिरात लग्न केले. सिद्धार्थ आणि अदिती अजून त्यांच्या लग्नाची कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही, पण लवकरच दोघे त्यांच्या लग्नाची घोषणा करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांनी 2021 मध्ये तामिळ-तेलुगू या भाषेतील 'महा समुद्रम्' आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी एकत्र अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. सिद्धार्थ आणि अदिती हे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करतात.

सिद्धार्थचा आगामी चित्रपट

सिद्धार्थचा 'चित्ता' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. कमल हासन, काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत शंकरच्या इंडियन 2 या चित्रपटामध्ये सिद्धार्थ देखील काम करणार आहे.

अदितीचा आगामी चित्रपट

अदिती राव हैदरी ही लवकरच हिरामंडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मनीषा कोईराला,सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा,संजीदा शेख,शर्मीन सेगल या अभिनेत्री देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT