Aditi Rao Hydari And Siddharth esakal
Premier

Aditi Rao Hydari And Siddharth: सिद्धार्थ आणि अदितीनं गुपचूप उरकला साखरपुडा; खास फोटो शेअर करत म्हणाले...

Aditi Rao Hydari And Siddharth: सिद्धार्थ आणि अदितीनं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघे अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहेत.

priyanka kulkarni

Aditi Rao Hydari And Siddharth: प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) यांनी लग्न केलं आहे, अशी चर्चे कालपासून (27 मार्च) सोशल मीडियावर होत आहे. या दोघींनी  तेलंगणातील एका मंदिरात लग्न केले, असं म्हटलं जात होतं. अशातच आता सिद्धार्थ आणि अदितीनं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघे अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहेत.

सिद्धार्थ आणि अदितीनं शेअर केला फोटो

सिद्धार्थ आणि अदिती यांचा साखरपुडा झाला आहे. या दोघांनी त्यांचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अदितीच्या बोटात डायमंड असलेली अंगठी दिसत आहे तर सिद्धार्थच्या हातात सोन्याची अंगठी दिसत आहे. सिद्धार्थ आणि अदिती एंगेज झाले आहेत. सिद्धार्थनं अदितीसोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "तिनं होकार दिला! एंगेज"

तसेच अदितीनं देखील सिद्धार्थसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "त्यानं होकार दिला! एंगेज"

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांनी 2021 मध्ये रिलीज झालेल्या तामिळ आणि तेलुगू या भाषेतील 'महा समुद्रम्' या चित्रपटात काम केलं. सिद्धार्थ आणि अदिती हे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करतात. त्यांच्या डेटिंगची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु होती, अशातच आता सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांचा साखरपुडा झाला आहे.

अदितीची हीरामंडी वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अदितीची हीरामंडी ही वेब सीरिज लवकरच रिलीज होणार आहे. ही वेब सीरिज 1 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला,सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा,संजीदा शेख,शर्मीन सेगल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT