munjya movie box office  
Premier

Munjya: कोकणातल्या भुताने तोडला कमाईचा रेकॉर्ड! १७ दिवसात मराठी दिग्दर्शकाचा 'मुंज्या' १०० कोटी पार, वाचा कलेक्शन

Munjya Box Office Collection: आता पुन्हा एकदा प्रेक्षकांनी 'मुंज्या'ला उचलून धरलं आहे. 'मुंज्याने' १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

Payal Naik

Munjya Box Office: लोकप्रिय मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याच्या 'मुंज्या' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होती. कोकणातल्या 'मुंज्या' या भुताच्या दंतकथेवर आधारीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केलं. आता 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या १७ दिवसात या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. मराठमोळ्या दिग्दर्शकाचा हा चित्रपट आता १०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. वाचा चित्रपटाची एकूण कमाई.

'स्त्री', 'भेडिया', 'ऋषी' या चित्रपटानंतर 'मुंज्या' प्रेक्षकांच्या भेटीला आला. एका हट्टी मुलाची मुन्नीशी लग्न करण्याची इच्छा अपूर्ण राहते त्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो आणि हा मुंज्या जन्माला येतो. त्यानंतर सुरू होतो खरा चित्रपट. अशी कथा असलेला 'मुंज्या' प्रेक्षकांना आवडला आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. आता याच मुंज्याने कमाईचा रेकॉर्ड तोडला आहे. या आठवड्यात जबरदस्त कमाई करत 'मुंज्या'ने १०० कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने १०० कोटी ३ लाखांची कमाई केली आहे.

कलाकारांनी एक पोस्ट शेअर करत 'मुंज्या'च्या कमाईचे आकडे सांगितले आहेत. या चित्रपटाच्या कमाईमुळे चाहतेही आनंदात आहेत. 'मुंज्या'या चित्रपटात अभय वर्मा, शर्वरी वाघ यांच्यासोबत मोना सिंह, सुहास जोशी, श्रुती मराठे, अजय पुरकर, भाग्यश्री लिमये, आयुष उलागड्डे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आता कलाकारांच्या आनंदालाही पारावर उरला नाहीये. तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT