Rakul Preet Singh & Aman Preet Singh Esakal
Premier

Rakul Preet Singh Brother Arrest : भावाप्रमाणेच रकुलप्रीतही अडकली होती ड्रग प्रकरणात ; काय घडलं होतं नेमकं ?

Rakul Preet Singh Drug Case : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या भावाला अमनप्रीतला ड्रग प्रकरणात अटक केल्यानंतर पुन्हा चर्चेत आली आहे. राकुलप्रीतही काही काळापूर्वी ड्रग प्रकरणात अडकली होती. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Rakul Preet Singh : बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंह हिचा भाऊ अमन याला पोलिसानी ड्रग प्रकरणात नुकतीच अटक केली यामुळे अभिनेत्री राकुलप्रीतही चर्चेत आलीये. हैदराबादमध्ये त्याला अटक करण्यात आली असून ड्रग्जचे सेवन करणाऱ्या १३ जणांमध्ये त्याच्या नावाचा समावेश आहे. या प्रकरणामुळे अभिनेत्री रकुलप्रीतचंही जुनं प्रकरण चर्चेत आलं आहे. रकुलने रिया चक्रवर्तीला ड्रग्ज मिळवून देण्यात मदत केल्याच्या संशयावरून नार्कोटिस्ट विभागाने तिला समन्स बजावलं होतं.

काय घडलं होतं नेमकं ?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावेळी पोलिसांनी त्याची तथाकथित गर्लफ्रेंड रियाला त्यावेळी अटक केली होती. यावेळी रियाचं नाव ड्रग्ज प्रकरणातही पुढे आलं होतं. या प्रकरणात अधिक तपस करतेवेळी नार्कोटिस्ट विभागाला रिया आणि रकुल यांचे ड्रग्ज संबधी चॅट सापडले होते. यावेळी राकुलने रियाशी हे चॅट केल्याची पुष्टी चौकशी दरम्यान दिली होती. पण चौकशीदरम्यान तिने कोणत्याही प्रकारे ड्रग्जचं सेवन केल्याचं नाकारलं होतं. यावेळी रकुलने रियाला ड्रग पुरवल्याचा संशयही नार्कोटिस्ट विभागाला होता पण याबाबत तिने नकार दिला होता. तर कोणत्याही ड्रग्ज विकणाऱ्या दलालाशी तिचा संबंध नसल्याचं तिने चौकशीदरम्यान सांगितलं होत. पुढे तिची या प्रकरणात अधिक चौकशी करण्यात आली नाही किंवा तिच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.

रकुलप्रीतच्या भावाला आज पोलिसांनी अटक केल्यामुळे पुन्हा एकदा राकुलप्रीतचंही हे वादग्रस्त प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे. अमनप्रीतच्या अटकेबाबत रकुलप्रीत किंवा तिच्या कुटूंबाने अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाहीये. तर अमनप्रीतला पोलिसांनी अटक केली असून त्याला लवकरच न्यायालयात सादर केलं जाणार असल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

दरम्यान, अंमली पदार्थांच्या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासाबाबत अंमलबजावणी संचालनालयाने रकुलला यापूर्वी समन्स पाठवले होते. याबाबत विचारणा केली असता पोलिसांनी स्पष्ट केले की, “तिचा या प्रकरणात सहभाग नाही आणि आम्ही तिची चौकशी करत नाही. यामध्ये तिचे नाव अनावश्यकपणे ओढण्याची गरज नाही, त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करणार नाही.”

रकुलप्रीत सिंह आणि तिचा नवरा जॅकीने नुकतीच अनंत अंबानींच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. यावर्षीच ही जोडी लग्नबंधनात अडकली होती. तर जॅकी भगनानीच्या वडिलांना सिनेनिर्मिती क्षेत्रात झालेल्या तोट्यामुळेही हे कुटूंब चर्चेत होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT