aishwarya and avinash narkar  esakal
Premier

अविनाश आणि ऐश्वर्या नारकरांचं नवं घर; दिवाळीच्या आधी दिली आनंदाची बातमी, व्हिडिओमधून शेअर केली खास झलक

Aishwarya Narakar Buy New Home:अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर यांनी नुकतंच नवं घर घेतलं आहे. आता त्यांनी त्याचा एक छोटासा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्या दोघांनीही अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे, ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते दोघेही आपले हटके व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता या दाम्पत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी नवं घर खरेदी केलं आहे. हे घर कुठे आहे याबद्दल त्यांनी काही सांगितलं नसलं तरी त्यांनी घराच्या आजूबाजूची एक झलक शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. त्यांनी त्याचे पझेशन घेतल्यानंतरचा फोटो शेअर केलाय.

ऐश्वर्या आणि अविनाश हे सिनेसृष्टीतील सदाबहार कपल आहेत. त्यांच्या व्हिडिओवर चाहते भरभरून कमेंट करत असतात. तर ऐश्वर्या फिटनेसचे धडे देतानाही दिसतात. आता त्यांनी आपलं नवं घर घेत आपला आनंद चाहत्यांसोबतही शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या नव्या घराच्या आजूबाजूच्या परिसराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, 'आनंदाचा नवीन रस्ता… आमचं नवीन घर'. सोबतच या घरात आपण फोटो कुठे लावणार आहोत हे देखील त्यांनी सांगितलं आहे. सध्या चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

नारकर दाम्पत्याने घेतलं नवं घर
नारकर दाम्पत्याने घेतलं नवं घर

ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारत आहेत. याशिवाय अविनाश नारकर देखील अनेक मालिकांमध्ये दिसतात. यापूर्वी ते 'कन्यादान' या मालिकेत दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT