Aishwarya Rai And Abhishek Bachchan esakal
Premier

Aishwarya Rai And Abhishek Bachchan: घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच ऐश्वर्या-अभिषेकने केलं लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन; फोटो चर्चेत

Aishwarya Rai And Abhishek Bachchan: ऐश्वर्या आणि अभिषेकने नुकताच त्यांच्या लग्नाचा 17 वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर अभिषेकने त्याचा ऐश्वर्या आणि लेक आराध्यासोबतचा फोटो शेअर केलाय.

priyanka kulkarni

Aishwarya Rai And Abhishek Bachchan: गेल्या काही काळापासून ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. सोशल मीडियावर त्यांचे कमी दिसणारे पोस्ट्स आणि त्यांचा कमी झालेला एकत्र वावर यामुळे या चर्चा सुरु होत्या. पण नुकतंच अभिषेकने शेअर केलेल्या या पोस्टमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला. ऐश्वर्या आणि अभिषेकने नुकताच त्यांच्या लग्नाचा 17 वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर अभिषेकने त्याचा ऐश्वर्या आणि लेक आराध्यासोबतचा फोटो शेअर केलाय.

ऐश्वर्या आणि अभिषेकचा काल म्हणजे 20 एप्रिल 2024 ला लग्नाचा वाढदिवस होता. यानिमित्त अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ऐश्वर्या, आराध्यासोबतचा फोटो शेअर केलाय आणि हार्ट ईमोजी कॅप्शनमध्ये दिलीये. या तिघांचा फॅमिली फोटो सोशल मीडियावर सगळ्यांना पसंत पडला असून अनेकांनी कमेंट करत त्यांना वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या.

गेला बराच काळ ही जोडी एकत्र न दिसल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या वेगळं होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ऐश्वर्या आणि तिच्या सासू-सासऱ्यांमध्ये बेबनाव असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता आणि याला सगळेजण अभिषेकची बहीण श्वेताला जबाबदार धरत होते. पण काही काळापूर्वी संपूर्ण बच्चन कुटूंबाने आर्चीज सिनेमाच्या प्रीमियरला एकत्र हजेरी लावत या अफवांना पूर्णविराम दिला.

तर मध्यंतरी या जोडीचे होळी सेलिब्रेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. नव्याने शेअर केलेल्या फोटोजमध्ये ऐश्वर्या सगळ्यांसोबत होलिका दहनाला उपस्थित असलेली दिसली. त्यामुळे बच्चन कुटूंबात सगळं काही आलबेल असल्याचं निदर्शनास आलं.

सेलिब्रटींनी दिल्या शुभेच्छा

रितेश देशमुख, मुक्ती मोहन, सबा पतौडी यांनी सोशल मीडियावर कमेंट करत या तिघांच्या फोटोजचं कौतुक केलं. तर त्याच्या चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

२० एप्रिल २००७ ला अभिषेक आणि ऐश्वर्याने शाही थाटात लग्नगाठ बांधली. अतिशय खासगी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नसोहळ्याचे फार फोटोज उपलब्ध नाहीयेत. पण या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीमधील सगळ्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नानंतरच्या विधींचे फोटोजही बराच काळ चर्चेत होते.

ऐश्वर्या आणि अभिषेकची लेक आराध्याही सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आराध्या आता लवकरच पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार असल्याचं म्हंटलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT