Aishwarya rai  esakal
Premier

स्वतःच्या मामीला विसरलीस का? आलियाचं कौतुक करणाऱ्या नव्या नंदावर भडकले ऐश्वर्याचे फॅन्स; म्हणाले

Aishwarya Rai Fans Trolled Navya Nanda :आलिया भट्टने यावर्षी पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण केले आणि धमाल केली. जेव्हा त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली तेव्हा नव्या नंदाने कमेंट करून त्याला पाठिंबा दिला.

Payal Naik

नुकताच पॅरिस फॅशन वीक पार पडला. या कार्यक्रमात आलिया भट्ट हिने डेब्यू केला होता. तिने स्टेजवरील काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. ज्यावर अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने कमेंट केली. या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या आयआयएम अहमदाबाद येथे शिकत असलेल्या नव्याने आलियाच्या कौतुकाचे पूल बांधले मात्र यावर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे चाहते तिच्यावर चांगलेच संतापले. हे नेमकं प्रकरण काय आहे?

नव्या सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. त्याचं कारण म्हणजे ऐश्वर्या राय. पॅरिस फॅशन वीकमध्ये आलिया भट्टसोबत ऐश्वर्याने देखील सहभाग घेतला होता. तिनेही तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. मात्र नव्याने फक्त आलियाचं कौतुक केलं आणि स्वतःच्या मामीबद्दल एकही शब्द काढला नाही. हे नेटकऱ्यांना खटकलं त्यामुळेच अनेक चाहत्यांनी नव्यावर निशाणा साधला आहे. एका युझरने लिहिलं, 'कधीतरी स्वतःच्या मामीला पण सपोर्ट करत जा.' एकाने लिहिलं, 'आता काकीला सपोर्ट केला. आता मामीला पण सपोर्ट कर.' दुसऱ्याने लिहिलं, 'ही तर एकदम छोटी श्वेता बच्चन झालीये.' याशिवाय अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे.

यापूर्वीही अनेकदा नव्याने ऐश्वर्याला अशी वागणूक दिल्याचं समोर आलं होतं. तिने तिच्या पॉडकास्ट शोमध्ये आजी आणि आईला बोलावलं होतं. मात्र तिने ऐश्वर्याला कधीही बोलावलं नाही. तर गेले अनेक दिवस बच्चन कुटुंबात आणि ऐश्वर्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा आहे. त्यांच्यापैकी कुणीही याबद्दल बोलायला तयार नसलं तरी त्यांच्या वागण्यावरून सगळं चित्र उघड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro 2B: मेट्रो-२ बीचा पहिला टप्पा कधी सुरू होणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या मार्ग...

Thane News: नागरिकांनो सावधान! दिवाळीच्या उत्साहात पाकिटमारांचा हैदोस, पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

मुलगा झाला हो ! ऐन दिवाळीत राघव - परिणितीने दिली आनंदाची बातमी

Jalgaon Airport : जळगाव विमानतळाचा विकास ठप्प; प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक ८ महिन्यांपासून नाही

Shanivarwada Controversy : शनिवारवाड्यासमोर तणाव वाढला! 'त्या' व्हिडीओनंतर मेधा कुलकर्णींसह हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT