Ajay Devgan & Tabu  Esakal
Premier

Ajay Devgan & Tabu : 'दृश्यम' नंतर अजय तब्बू पुन्हा एकत्र; नव्या सिनेमाचा टीझर चर्चेत

अभिनेता अजय आणि अभिनेत्री तब्बू यांचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

'दृश्यम' या गाजलेल्या सिनेमानंतर अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'औरों में कहा दम था' असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.

सिनेमाच्या टीझरने वेधलं लक्ष:

एकमेकांच्या प्रेमात असलेले अजय आणि तब्बू एकमेकांपासून स्वतःच्याच चुकीमुळे दुरावतात अशी या सिनेमाची कथा आहे. सिनेमाचं टीझर अजयच्या आवाजाने सुरु होतो. अजय त्यांची लव्हस्टोरी टीझरमध्ये कवितेतून व्यक्त करत असून तब्बू आणि अजय एकमेकांना मिठी मारताना दिसतायत त्यानंतर अजय कोणाला तरी मारताना दिसत असल्याचं या टीझर मध्ये पाहायला मिळतंय. 'दुष्मन थे ही अपने औरों में कहा दम था' असं कॅप्शन या टीझरला देण्यात आलं आहे.

पहा टीझर:

टीझर पाहून प्रेक्षक उत्सुक

सिनेमाचा टीझर चाहत्यांना आवडला असून अनेकांनी कमेंट्स करत हा सिनेमा बघण्यासाठी ते उत्सुक आहेत अशा कमेंट्स केल्या आहेत. तर सेलिब्रिटीजनीही कमेंट करत अजयला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

'ही' आहे सिनेमाची टीम

या सिनेमात अजय आणि तब्बू व्यतिरिक्त जिमी शेरगील, शंतनू महेश्वरी आणि सई मांजरेकर यांची मुख्य भूमिका आहे तर नीरज पांडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ही फिल्म एक म्युझिकल फिल्म असणार आहे. २३ वर्षांत घडलेली एक प्रेमाची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. या शिवाय अनेक भाषांमध्ये ही फिल्म रिलीज होणार आहे. ५ जुलै २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

तब्बू आणि अजयने केलंय या सिनेमात काम

अजय आणि तब्बू यांनी या आधी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. 'विजयपथ', 'हकीकत', 'तक्षक', 'दृश्यम', 'गोलमाल अगेन', 'दे दे प्यार दे दे', 'दृश्यम २' आणि 'भोला' या सिनेमात ते काम केलं आहे.

अजय या बरोबरच 'सिंघम अगेन' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तर तब्बू 'ड्यून: प्रॉफेसी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत तर तिचा 'क्रू' हा सिनेमा खूप गाजला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election Campaign : यायला-जायला वाहन, अन् रोजच्या रोज पैसे बी! महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रॅलीतील शेतमजूर महिलांना रोजगार

Weekly Love Horoscope 12 to 18 January 2026: शुक्र मकर राशीत प्रवेश करताच ‘या’ लोकांच्या लव्ह लाईफमध्ये वाढणार गोडवा

Makar Sankranti 2026: संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना बोरन्हाण का आणि कसं घालतात? वाचा यामागचं खरं कारण

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Nashik Zilla Parishad : बोगस दिव्यांगांचे धाबे दणाणले; नाशिक जिल्हा परिषदेच्या १०६ कर्मचाऱ्यांची मुंबईत होणार तपासणी

SCROLL FOR NEXT