akshay kumar  sakal
Premier

Akshay Kumar: अरेच्चा! करोनाच्या चर्चांमध्ये अनंत राधिकाच्या रिसेप्शनला पोहोचला अक्षय कुमार; नेटकऱ्यांनी दिला खास सल्ला

Akshay Kumar At Anant Ambani Wedding: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या पत्नीसोबत अनंत अंबानी आणि राधिकाच्या रिसेप्शनला पोहोचला होता.

Payal Naik

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधली. या लग्नाला अनेक बड्या कलाकार आणि नेत्यांनी हजेरी लावली. मोठमोठे बिझनेसमन या लग्नासाठी हजर होते. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नात कसलीही कमतरता ठेवली नव्हती. हा लग्नसोहळा पाहून सगळ्यांचे डोळे दिपले होते. मात्र आता या लग्नातील एक व्हिडिओ समोर येतो आहे ज्यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचं कारण आहे अभिनेता अक्षय कुमार. खिलाडी कुमारला करोना झाल्याने तो अनंत आणि राधिकाच्या लग्नात हजर राहू शकणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तो राधिका- अनंतच्या रिसेप्शनला गेल्याचं दिसतंय.

अनंत आणि राधिकाच्या लग्नाचं रिसेप्शन १४ जुलै रोजी आयोजित करण्यात आलं होतं. हे रिसेप्शन खास अंबानींच्या बड्या कंपनीतील मोठ्या पदावरील खास व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलं होतं. मात्र या सोहळ्याला अभिनेता अक्षय कुमार पोहोचल्याने सगळेच चकीत झाले. त्याने पत्नी ट्विंकल खन्ना हिच्यासोबत रिसेप्शनला हजेरी लावली होती. ११ जुलै रोजी अक्षयला करोना झाल्याचं समोर आलं होतं. त्याने स्वतःला क्वारंटाइनदेखील केलं होतं. इतकंच नाही तर त्याचे काही क्रू मेंबर्सदेखील पॉझिटिव्ह झाले होते. मात्र आता त्याला या कार्यक्रमात पाहून सगळेच चकीत झाले. यावर नेटकरी आपली प्रतिक्रिया देत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं, 'याला तर करोना झाला होता ना, हा लगेच बरा कसा झाला?'दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'तू त्यांना नंतर घरी जाऊन भेटला असता तरी चाललं असतं, लगेच येण्याची गरज नव्हती. ते तुझ्यावर रागावले नसते.' तिसऱ्याने लिहिलं, 'अरे हा इकडेतिकडे का फिरतोय? सगळ्यांना आजारी पाडायचय का?' तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयची दुसरी करोना टेस्ट ही निगेटिव्ह अली आहे. त्यामुळे तो या कार्यक्रमाला हजर राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: वडील युट्यूबवर एअर शोचे व्हिडिओ स्क्रोल करत होते... तेवढ्यात विंग कमांडर मुलाच्या मृत्यूची बातमी कळली

Latest Marathi News Live Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Ind vs SA 2nd Test : रिषभ पंतच्या नेतृत्वाची 'टेस्ट'! आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना, मायदेशातील प्रतिष्ठा पुन्हा पणास

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सवाचा श्रीगणेशा; फर्ग्युसनच्या मैदानावर १३ ते २१ डिसेंबरपर्यंत साहित्य मेळा

बाबो ही तर सेम आलियाचं दिसते! ऊत सिनेमातील आर्या सावे म्हणाली, 'पण माझी आवडती अभिनेत्री...'

SCROLL FOR NEXT