Akshay Kumar esakal
Premier

Akshay Kumar: "ज्या घरात पाचशे रुपये भाडं घेऊन राहिलो, तेच घर आता विकत घेणार"; अक्षय कुमारनं सांगितल्या जुन्या घराच्या आठवणी

Akshay Kumar: अक्षयने पहिल्यांदाच त्याच्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. त्याची शाळा आणि त्याचं जुनं घर त्याच्यासाठी का खास आहे? हे त्याने एका मुलाखतीत शेअर केलं.

priyanka kulkarni

Akshay Kumar: फिटनेससोबतच आपल्या साध्या जीवनशैलीमुळे चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar). कायमच त्याच्या ऍक्शन सिनेमांमुळे चर्चेत राहणाऱ्या अक्षयने पहिल्यांदाच त्याच्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. त्याची शाळा आणि त्याचं जुनं घर त्याच्यासाठी का खास आहे? हे त्याने एका मुलाखतीत शेअर केलं.

अक्षयनं सांगितल्या बालपणीच्या आठवणी

अक्षयचा लवकरच बडे मियाँ छोटे मियाँ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने रणवीर अलाहबादियाला मुलाखत दिली. यावेळी अक्षयने तो आजही त्याच्या शाळेला आणि जुन्या घराला भेट देत असल्याचा खुलासा केला. तो म्हणाला,"मी आजही महिन्यांतून एकदा पहाटे चार वाजता माझी गाडी काढतो आणि माझ्या शाळेत डॉन बॉस्को मध्ये जातो. कधी कधी माझ्या सायनच्या जुन्या घरी तर कधी बांद्रयाच्या घराजवळही जातो. माहित नाही का, पण मला तिथे जायला आवडतं. माझ्या जुन्या घरी जायला मला आवडतं. ज्या जुन्या घरात आम्ही भाड्याने राहायचो. ५०० रुपये घराचं भाडं तेव्हा आम्ही द्यायचो. आता असं ऐकायला आलंय की, ती इमारत तोडून त्याचं नवीन बांधकाम सुरू करणार आहेत. मी तिथे सांगून ठेवलंय की, मला तिसरा मजला खरेदी करायचाय, कारण मी तिथे राहायचो. 2 bhk फ्लॅट तिथे तयार होतं आहे आणि मी आधीच सांगून ठेवलंय की मला तिथे एक फ्लॅट विकत घ्यायचा आहे. तिकडे कुणीही नाहीये माझं पण मला ते घर आठवण म्हणून ठेवायचंय. माझे वडील तेव्हा कामाला जायचे. ९ ते ६ कामावर असायचे. मला अजूनही लक्षात आहे कि, माझी बहीण आणि मी खिडकीत उभं राहून त्यांची वाट बघत असायचो. आमच्या सोसायटमध्ये पेरूचं झाड होतं. त्याचे पेरू आम्ही तोडायचो. आजही मी तिथे जातो. तिथे अनंताचं पण झाड आहे ज्याला अजूनही फुलं येतात. ती फुलं , पेरू मी अजूनही तोडून घरी घेऊन येतो. " या आठवणी सांगताना अक्षय भावूक झाला.

अक्षयचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' होणार रिलीज

११ एप्रिलला अक्षयचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या सिनेमात अक्षय कुमार आणि टायगर सोबत मानुषी छिल्लर, अलाया फर्नीचरवाला, पृथ्वीराज सुकुमारन, रोनित रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Lokayukta Raid : ...अन् 1 लाखाचा सौदा 75 हजारांवर ठरला! दुकानाचा ताबा मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडलं

Bike tyre replacement : टू-व्हीलर गाडीचे टायर किती दिवसांनी बदलावेत? मोठं नुकसान होण्याआधीच जाणून घ्या

Mumbai News: बीएमसीची मोठी कारवाई! मुंबईतील ५० वर्ष जुन्या दर्ग्यावर बुलडोझर, व्हिडिओ व्हायरल

India Nepal Border Dispute : लिपुलेख-कालापानी वादात चीनची एन्ट्री? भारताने नेपाळला सुनावले; द्विपक्षीय यंत्रणा असताना तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही!

SCROLL FOR NEXT