Akshay Kumar esakal
Premier

Akshay Kumar: "त्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होतं अन्..."; खिलाडी अक्षनं सांगितला चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव

Akshay Kumar: अक्षयनं त्याच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली. अक्षयनं सांगितलेल्या या घटनेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Akshay Kumar: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चाहता वर्ग मोठा आहे. अक्षयची एक झलक पाहण्याची तसेच त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा अनेकांना असते.अक्षय हा सध्या त्याच्या बड़े मियाँ छोटे मियाँ (Bade Miyan Chote Miyan) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिजी आहे. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये अक्षयनं हजेरी लावली. यावेळी अक्षयनं त्याच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली. अक्षयनं सांगितलेल्या या घटनेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

काय म्हणाला अक्षय?

अक्षयनं टायगर श्रॉफसोबत रणवीर अल्लाबदियाच्या द रणवीर शो या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी रणवीरनं अक्षयला त्याच्या चाहत्याबद्दलची एक आठवण शेअर करायला सांगितली. यावेळी अक्षय म्हणाला, "एकदा गर्दीतील लोकांना मी शेकहँड करत होतो. अचानक माझ्या हातातून रक्तस्त्राव सुरु झाला. मग मला समजले की, त्या गर्दीमधील एका चाहत्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होत आणि त्याने माझा हात कापला होता."

द रणवीर शो या पॉडकास्टमध्ये अक्षयनं त्याच्या लाईफस्टाईलबद्दल, फिटनेसबद्दल देखील सांगितलं. अक्षयनं त्याच्या डायलॉग्सवर नेटकऱ्यांनी तयार केलेल्या मिम्सबद्दल देखील सांगितलं. अक्षय त्या मिम्सबद्दल म्हणाल्या, "मी ते मिम्स पाहून खूप हसतो."

कधी रिलीज होणार बड़े मियाँ छोटे मियाँ?

अक्षय आणि टायगर श्रॉफचा बड़े मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट अली अब्बास जफरनं दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, अलाया एफ, मानुषी छिल्लर आणि सोनाक्षी सिन्हा हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. हा 10 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

अक्षयचा आगामी चित्रपट

अक्षयचा वेलकम टू द जंगल हा कॉमेडी चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अर्शद वारसी, संजय दत्त,रवीना टंडन,लारा दत्ता,जॅकलिन फर्नांडिस,दिशा पटानी,श्रेयस तळपदे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT