akshay kumar  sakal
Premier

Akshay Kumar: अक्षय कुमारला करोनाची लागण; अंबानींच्या लग्नसोहळ्याला राहणार गैरहजर, स्वतःला केलं क्वारंटाइन

Akshay Kumar Test Covid Positive: गेल्या दोन दिवसांपासून अक्षय कुमारची प्रकृती ठीक नव्हती. सरफिराच्या प्रमोशनमध्ये तो सतत व्यस्त होता.

Payal Naik

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येते आहे. अक्षय कुमारला करोनाची लागण झाली आहे. तो कोविड १९ पॉसिटीव्ह झाला आहे. गेले अनेक दिवस तो 'सरफिरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. आज १२ जुलै रोजी त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र आज सकाळीच त्याला करोनाचं निदान झालं आहे. गेले दोन दिवस अभिनेत्याची प्रकृती बिघडली होती. अखेर त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अक्षय आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात उपस्थित राहू शकणार नसल्याचं वृत्त आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमार गेले दोन दिवस आजारी होता. तरीही तो सतत 'सरफिरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. मात्र तब्येत बारी नसल्याने त्याने काही टेस्ट करून घेतल्या आणि त्या टेस्टमध्ये तो करोना पॉसिटीव्ह असल्याचं निदान झालं. अभिनेत्याने स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. तो एका वेगळ्या ठिकाणी इतरांपासून दूर राहत आहे. ती डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहे आणि सावधानता बाळगत आहे.

अक्षयबद्दलच्या या बातमीने चाहते मात्र काळजीत पडले आहेत. अक्षय १२ जुलै रोजी अंबानींच्या लग्नात हजेरी लावणार होता मात्र आता करोना झाल्यानंतर तो राधिका आणि अनंत यांच्या लग्नात जाऊ शकणार नाहीये. यापूर्वी तो अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या प्रेवेडींग फंक्शनमध्ये सहभागी झाला होता. त्याने पहाटे ३ पर्यंत डान्सदेखील केला होता. त्याने या कार्यक्रमाला चार चांद लावले होते. आता मात्र तो या शाही सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीये. अक्षयबद्दलच्या या बातमीने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

आज १२ जुलै रोजी त्याचा 'सरफिरा' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. अक्षयही या चित्रपटासाठी खूप उत्सुक होता. मात्र आता पुढील काही दिवस त्याला क्वारंटाइनमध्ये काढावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार?

Navneet Rana: नवनीत राणा यांना बॉम्बने उडविण्याची धमकी; हैदराबादवरून रजिस्टर डाकेने आले पत्र

Solapur News: सोलापुरात आता रात्री २१ ठिकाणी ‘सरप्राईज’ नाकाबंदी; वाहतूक पोलिसही असणार मदतीला; चोरी, दरोड्याच्या घटना रोखण्यासाठी निर्णय

Women's World Cup Team: वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघात हरमनप्रीत कौरला स्थान नाही; भारताच्या तीन खेळाडूंची निवड, कॅप्टन कोण?

फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची मोडली, व्यासपीठावर उडाला गोंधळ; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT