akshaya deoddhar in zee marathi new serial esakal
Premier

अखेर पाठकबाईंची झी मराठीवर एंट्री झालीच! 'या' मालिकेत दिसणार अक्षया देवधर, पोस्ट शेअर करत म्हणाली- नवा प्रवास...

Akshaya Deodhar In Zee Marathi Serial: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर हिची झी मराठीवर एंट्री झाली आहे. ती नव्या मालिकेत दिसणार आहे.

Payal Naik

Akshaya Deodhar New Serial: छोट्या पडद्यवरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. अक्षयाने पाठक बाई बनून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतुन ती घराघरात पोहोचली. त्यानंतर मात्र अनेक वर्ष अक्षया छोट्या पडद्यावरून गायब होती. प्रेक्षक तिच्या नव्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र अक्षया काही वेगळ्या कामात गुंतल्यामुळे छोट्या पडद्यावर परत आली नव्हती. मात्र आता अक्षयाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. प्रेक्षकांची लाडकी पाठकबाई आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. ती आता झी मराठीच्या नव्या मालिकेमध्ये झळकणार आहे.

दोन दिवसापूर्वी झी मराठीची नवी मालिका 'लक्ष्मी निवास' चा प्रोमो शेअर करण्यात आला. यात त्यांच्या फोटोत उभ्या असलेल्या अक्षयाला प्रेक्षकांनी ओळखलं. 'लक्ष्मी निवास या मालिकेत अभिनेते तुषार दळवी आणि अभिनेत्री हर्षदा खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत. तर पाठकबाई म्हणजेच अक्षया त्यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात येतंय. आपल्या मुलींच्या लग्नासाठी चिंतेत असलेले आईवडील स्वतःच्या घराचं स्वप्न उराशी बाळगून आहेत. अक्षयाने एक पोस्ट करत तिच्या नव्या मालिकेबद्दल सांगितलं आहे. तिने हर्षदा आणि तुषार यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिलंय, 'लक्ष्मी निवास नवा प्रवास सुरू.' आता प्रेक्षक तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

अक्षयाने हार्दिक जोशीसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती एका चित्रपटातही झळकली. ती एक बिझनेस वूमनदेखील झाली आहे. तिने तिच्या मैत्रिणींसोबत मिळून एक साड्यांचं दालन सुरू केलंय. या दुकानाचं नाव भरजरी असून हे दुकान पुण्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT