Sakal Premier Award 2024  Sakal
Premier

Sakal Premier Award 2024 : मराठी चित्रपट ‘कान’मध्ये घेऊन जाणार : छाया कदम

छाया कदम यांच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज अ लाईट’ या चित्रपटाला ‘कान’ या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात मानाचा पुरस्कार मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

Sakal Premier Award 2024 : ‘माझी धाव राष्‍ट्रीय पुरस्कारांपर्यंतच होती. हा पुरस्कार मिळवल्याशिवाय मरायचे नाही, अशी इच्छा होती. फार पुढचा विचार केला नव्‍हता. ‘कान’मधील पुरस्काराबाबत तर मुळीच नाही. ‘ऑल वुई इमॅजिन ॲज अ लाईट’च्या निमित्ताने ‘कान’ला गेले आणि स्क्रीनिंगनंतर मी आमच्या टीममधील सर्वांना सांगायचे, ‘यार गट फीलिंग आहे.

ऐसे नहीं जाऊंगी, कुछ तो लेके जाऊंगी.’ ते सत्यात उतरले तेव्‍हा खूप वेगळा अनुभव होता. यानंतर जेव्‍हा मी ‘कान’ जाईन, तेव्‍हा मराठी चित्रपट घेऊन जायचे आहे,’ अशी भावना मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी व्‍यक्त केली.

यंदा छाया कदम यांच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज अ लाईट’ या चित्रपटाला ‘कान’ या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड’ सोहळ्यात गौरवले. त्या वेळी त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण सर्वांसमोर उभे केले.

त्या म्हणाल्या, ‘‘आपण कान फिल्म फेस्टिवलमध्ये आलो आहोत आणि येथून पुरस्कार घेऊन जात आहोत, हा एक वेगळाच आनंदाचा क्षण होता. मात्र, तेथून परतल्यावर हा आनंद द्विगुणित झाला. इकडे येईपर्यंत येथे काय चाललेय, याची माहिती नव्‍हती.

प्रत्येक जण भेटून मला सांगत होता की, ताई असे वाटत होते की आम्ही ‘कान’ला आहोत. आम्हीच तो पुरस्कार स्वीकारला आहे. आम्ही इथे नाचलो सेलिब्रेट केले, एकमेकांना पार्टी दिली. ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT