Pushpa 2 esakal
Premier

Pushpa 2: सहा मिनिटांच्या सीनसाठी 60 कोटी खर्च, एकूण बजेट किती? रिलीजपूर्वीच किती झालं वसूल? पुष्पा-2 बद्दल जाणून घ्या सर्वकाही

Pushpa 2: टीझरमधील भव्य दिव्य सेट पाहिल्यानंतर या चित्रपटाचं बजेट किती असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, जाणून घेऊयात पुष्पा-2 च्या बजेटबद्दल...

priyanka kulkarni

Pushpa 2: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा 2 (Pushpa 2) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा द राइज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर या चित्रपटाच्या टीमनं पुष्पा-2 ची घोषणा केली. आता पुष्पा-2 या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर रिलीज झाला आहे. यामधील टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. टीझरमधील भव्य दिव्य सेट पाहिल्यानंतर या चित्रपटाचं बजेट किती असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, जाणून घेऊयात पुष्पा-2 च्या बजेटबद्दल...

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा-2 या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आता चित्रपटाच्या बजेटबद्दल आणि ओटीटी प्लॅटफॉर्म राइट्सबद्दल माहिती समोर आली आहे.

नेटफ्लिक्स विकत घेतले ओटीटी राइट्स

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मनं पुष्पा-2 या चित्रपटाचे डिजिटल राइट्स विकत घेतले आहेत. नेटफ्लिक्सने पुष्पा 2 या चित्रपटाचे राइट्स 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. पुष्पा 2 या चित्रपटाचे ग्लोबल म्युझिक राइट्स आणि हिंदी सॅटेलाइट राइट्स टी-सीरीजने 60 कोटी रुपयांना विकत घेतले आहे, असं म्हटलं जात आहे. म्हणजेच रिलीजआधीच पुष्पा-2 या चित्रपटानं जवळपास 160 कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाचं बजेट किती?

पुष्पा 2 या चित्रपटाचं बजेट 500 कोटींच्या आसपास पोहोचले आहे. या चित्रपटातील 6 मिनिटांच्या एका सीनसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी 60 कोटी रुपये खर्च केले होते. रिपोर्टनुसार, हा सीन शूट करण्यासाठी जवळपास एक महिना लागला.

कधी रिलीज होणार पुष्पा-2?

'पुष्पा 2' हा चित्रपट 15 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दिग्दर्शक सुकुमारच्या या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT