amla paul baby sakal
Premier

बधाई दो! दुसऱ्या लग्नाच्या सात महिन्यानंतर लोकप्रिय अभिनेत्री झाली आई; व्हिडिओ शेअर करत सांगितलं बाळाचं नाव

Amala Paul: लोकप्रिय अभिनेत्री नुकतंच चिमुकल्याचं आगमन झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Amala Paul: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक गोड बातमी समोर येत आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नवीन आईचं आणि बाळाचं घरी जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. एक इंस्टाग्राम पोस्ट करत तिने ही बातमी दिली आहे. चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. चिमुकल्या बाळाच्या गृह्प्रवेशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत बाळाच्या बाबांचा उत्साह स्पष्ट दिसत आहे. त्यांनी आपल्या बाळाच्या स्वागतासाठी घर खूप सुंदररीत्या सजवलं आहे.

आणि बाळाचं नाव आहे...

अमलाने नोव्हेंबर २०२३ मध्ये जगत देसाई याच्याशी लग्नगाठ बांधली होती. हे अभिनेत्रीचं दुसरं लग्न आहे. लग्नाच्या २ महिन्यानंतर अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी देत आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. त्यानंतर तिने तिच्या बेबी बम्पसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. तिच्या डोहाळे जेवणाचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. एक पोस्ट करत तिने तिचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोबतच बाळाचं नावंही सांगितलं आहे. अमलाने पोस्ट करत लिहिलं, 'आम्हाला मुलगा झाला आहे. भेटा आमच्या छोट्या जादूगार 'इलाई'ला. ११ जून २०२४ रोजी त्याचा जन्म झाला.'

तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बाळाच्या वडिलांनी आई आणि बाळाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलेलं दिसत आहे. घरभर फुगे, बेडरूममध्ये सफेद रंगाचा पाळणा, वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीच्या वस्तू हे सगळं पाहुन अभिनेत्री प्रचंड आनंदी दिसत आहे. आता चाहते आणि इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दुसऱ्या लग्नाच्या ७ महिन्यांनंतर अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने मल्याळम चित्रपट 'नीलाथमारा' मधून डेब्यू केला होता. त्यानंतर ती 'देइवा थिरुमगल', 'मुप्पोझुधुम उन कर्पनाइगल', 'नायक', 'रन बेबी रन', 'इद्दारममयिलाथो', 'वीआईपी' सारख्या अनेक चित्रपटात झळकली. ती पृथ्वीराज सुकुमारन याच्या 'आदुजीविथम - द गोट लाइफ' या चित्रपटातही दिसली होती. आता चाहते तिला आयुष्यातील नव्या भूमिकेसाठी भरभरून आशीर्वाद देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

Job: एक लाख पगार, काम फक्त खायचं; वजन वाढलं तरी फायदाच! कुठे आहे ही नोकरी?

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT