Amar Singh Chamkila Movie sakal
Premier

Amar Singh Chamkila Movie : 'त्यांचं नातं तुटलं त्यात आमचा दोष…' असं आहे अमरजित यांच्या मुलाचं सावत्र बहिणींशी नातं

दिलजीत दोसांज आणि परिणीती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला ‘अमर सिंग चमकीला’ हा सिनेमा खूप चर्चेत आहे.

सकाळ वृत्तसेवा

दिलजीत दोसांज आणि परिणीती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला ‘अमर सिंग चमकीला’ हा सिनेमा खूप चर्चेत आहे. इम्तियाज अली या सिनेमाचे दिग्दर्शक असून हा सिनेमा सुप्रसिद्ध पंजाबी गायक जोडी चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजित कौर यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. शिवाय हा सिनेमा चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजित यांच्या नात्यावरसुद्धा हा भाष्य करतो.

अमरजोत आणि अमरसिंग चमकीला यांच्या दुसऱ्या पत्नी असून त्यांचं पहिलं लग्न गुरमेल कौर यांच्याशी झालं होतं. त्यांच्यापासून त्यांना दोन मुली आहेत. अमरजित आणि चमकीला यांची हत्या करण्यात आली होती. या सर्व गोष्टींवर हा सिनेमा दिसणार आहे. याबाबत अमरसिंग चमकीला आणि अमरजोत यांचा मुलगा जैमेन याने सिने पंजाब याला दिलेली मुलाखत आता चर्चेत आहे. “मी अमरसिंग चमकीला यांच्या पहिल्या कुटूंबाशी पण संपर्कात आहेत.

मला त्यांच्या पहिल्या पत्नीपासून दोन बहीण आहेत अमरजित आणि कमलदीप. मोठ्या बहिणीचं लग्न झालं असून तिला दोन मुलं आहेत तर कमलचं लग्न आता होईल.” (ही मुलाखत २०२३मध्ये दिलेली आहे.) यावर अधिक बोलताना तो म्हणाला,”मी जेव्हा गुरमेल यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी माझं चांगलं स्वागत केलं. हे पहिल्यापासून असंच आहे. यात आम्हा मुलांचा काहीच दोष नाही.”

अमरसिंग चमकीला आणि अमरजोत यांच्या मृत्यूनंतर जैमेनचा सांभाळ अमरजोत यांच्या आई-बाबांनी केला. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर जैमेन आणि त्यांच्या दोन्ही सावत्र बहिणी वडिलांच्या स्मृतिदिनादिवशी जत्रेचं आयोजन करतात.

अमरसिंग चमकीला हा सिनेमा १२ एप्रिल २०२४ ला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.

या सिनेमासाठी दिलजीत आणि परिणीती यांनी गाणीही गायली आहेत. या आधी परिणीती मिशन राणीगंज या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सिनेमात तिने अभिनेता अक्षयकुमार सोबत स्क्रीन शेअर केली आहे. तर दिलजीतचा आता ‘जट अँड ज्युलिएट ३’ या पंजाबी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: तळेगावात रस्त्याच्या मधूनच उसळला पाण्याचा प्रचंड फवारा... सर्व भयभीत... थरारक अन् अचंबित करणारा प्रकार

पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांच्या नातवाचे कांड, परदेशी महिलांच्या व्हिसाची सोय केली, देशात येताच अपहरण अन् अत्याचार

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन

IND vs ENG: 'त्या एका षटकाने सामना फिरला'; पराभवानंतर श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य, रवी बिश्नोईबाबत काय म्हणाला?

Ayodhya Ram Mandir: राममंदिरासाठी ‘सीईओं’ची नियुक्ती शक्य; ट्रस्टची सोमवारी बैठक; ‘एसआयटी’ अहवालावरही चर्चा

SCROLL FOR NEXT