Mandisa esakal
Premier

Mandisa: ग्रॅमी विजेत्या 47 वर्षीय गायिकेचा मृत्यू; घरात आढळला मृतदेह

Mandisa: 47 वर्षीय मंडिसाचा मृतदेह तिच्या घरात सापडला. पोलिसांनी तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे.

priyanka kulkarni

Mandisa: अमेरिकन आयडॉल सीझन 5 (American Idol) फेम आणि ग्रॅमी विजेती (Grammy winning singe) गायिका मंडिसाचा (Mandisa) मृत्यू झाला आहे. तिच्या निधनानं तिच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंडिसाच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या मृत्यूची दु:खद बातमी माहिती देण्यात आली आहे. 47 वर्षीय मंडिसाचा मृतदेह तिच्या घरात सापडला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे.

चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली

मंडिसाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "आम्ही तुम्हाला माहिती देतो की, काल मंडिसा तिच्या घरी मृतावस्थेत सापडली होती. आम्हाला तिच्या मृत्यूचे कारण माहित नाही. या कठीण काळात तिच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या मित्र मंडळासाठी तुम्ही प्रार्थना करावी, अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो. मंडिसा ही जगभरातील आव्हानांचा सामना करणाऱ्या लोकांसाठी प्रोत्साहन आणि सत्याचा आवाज होती." या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी मंडिसाला श्रद्धांजली वाहिली आहे.

जाणून घ्या गायिका मंडिसाबद्दल

मंडिसाचे पूर्ण नाव मंडिसा लिन हंडली असं आहे. तिने 2006 मध्ये अमेरिकन आयडॉलमध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमामुळे मंडिसाला विशेष लोकप्रियता मिळाली. अमेरिकन आयडॉल नंतर, 2007 मध्ये मंडिसाचा ट्रू ब्युटी नावाचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला. मंडिसाने अनेक हिट गाणी गायली.

मंडिसाला सर्वोत्कृष्ट समकालीन ख्रिश्चन म्युझिक अल्बम श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तिला ओव्हरकॉमर अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला होता.

मंडिसाचे अल्बम्स

मंडिसाने 'फ्रीडम', 'इट्स ख्रिसमस', 'व्हॉट इफ वुई रीअल,' 'आउट ऑफ द डार्क' आणि 'ओव्हरकमर' यासह अनेक अल्बम रिलीज केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : जंगलातील गुन्हेगारांना पकडले जाते, पण ठेवायचे कुठे? कोल्हापूर वनसंरक्षणातील गंभीर उणीव उघड

शिव ठाकरेपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याच्या घराला भीषण आग; थोडक्यात वाचला अभिनेता, व्हिडिओमधून दाखवली परिस्थिती

Latest Marathi News Live Update : अंधेरी पश्चिमेतील सॉरेंटो टॉवरमध्ये आग; नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले

Numerology : उशिरा का होईना पण यशस्वी होतातच 'या' तारखेला जन्मलेले लोक...नशिबात असतो अधिकारी बनण्याचा योग

Hormone Balance Tips: हार्मोन संतुलित ठेवायचे आहेत? सायली शिंदेचे खास योग व जीवनशैली टिप्स; दैनंदिन जीवनात कसे अमलात आणायचे पाहा

SCROLL FOR NEXT