Kalki 2898 AD 
Premier

Kalki 2898 AD : अमिताभ यांनी मागितली प्रभासच्या फॅन्सची माफी ; जुन्या फोटोमुळे आली बिग बींवर ही वेळ

Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रभासच्या फॅन्सची माफी मागितली. काय आहे यामागील कारण जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Amitabh Bachchan & Prabhas : प्रभास, अमिताभ यांची मुख्य भूमिका असलेला 'कल्कि 2898 एडी' हा सिनेमा आता येत्या काही दिवसांमध्ये रिलीज होतोय. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यांमध्ये सिनेमाच्या प्री बुकिंगला सुरुवात झालीये आणि उत्तर अमेरिकेतही या सिनेमाचं जोरदार प्री बुकिंग झालं आहे. २७ जूनला रिलीज होणाऱ्या या सिनेमातील कलाकारांविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आलीये. अमिताभ यांनी प्रभासच्या फॅन्सची माफी मागितली.

म्हणून मागितली माफी

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या कल्की सिनेमाच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर सिनेमातील कलाकार आणि निर्माते यांची एक मुलाखत घेण्यात आली, या मुलाखतीमध्ये अमिताभ यांनी प्रभासच्या फॅन्सची माफी मागितली. अमिताभ म्हणाले कि जेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक नाग अश्विन त्यांच्याकडे सिनेमाविषयी बोलण्यासाठी आले होते त्यावेळी ते एक फोटोही बरोबर घेऊन आले होते. तो फोटो हे दाखवण्यासाठी होता कि सिनेमातील त्यांची पात्रं कशी असतील. त्या फोटोमध्ये अमिताभ यांचं पात्र प्रभासच्या पात्राला धक्का देत होतं. हा किस्सा सांगितल्यानंतर बिग बींनी म्हंटलं कि, "मी प्रभासच्या फॅन्सची हात जोडून माफी मागतो. कृपया त्यांनी मला माफ करा."

ही आहे कास्ट

'कल्कि 2898 एडी' ही एक सायन्स फिक्शन फिल्म असून प्रभास, अमिताभ यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात दीपिका पदुकोण, कमल हासन, दिशा पाटणी, मृणाल ठाकूर, मालविका नायर, शोभना पशुपती, अन्ना बेन, ब्रह्मानंदम आणि राजेंद्र प्रसाद यांच्याही मुख्य भूमिका करतेय. वैजयंती मुव्हीज यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे तर संतोष नारायणन यांनी या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

ट्रेलरची होतेय चर्चा

कल्की सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा सोशल मीडियावर खूप होतेय. नवीन युग, काली नावाच्या व्यक्तीची असलेली सत्ता, जीवसृष्टीचा झालेला नाश आणि एका नवीन जीवाचा होणारा जन्म यावर हा सिनेमा बेतला असून प्रभास भैरवा तर अमिताभ अश्वत्थामा या भूमिका साकारणार आहेत तर दीपिकाच्या भूमिकेचं नाव अजून समजलं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT