amitabh bhachchan  sakal
Premier

T20 World cup: अख्खा देश टीव्हीकडे डोळे लावून बसला पण बिग बींनी नाही पाहिली भारताची मॅच, स्वत:च कारण सांगितलं

Amitabh Bachchan : टी २० वर्ल्डकप २०२४ची शेवटची मॅच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पाहिलीच नाही. त्यांनी त्याचं कारणही सांगितलं आहे

Payal Naik

बार्बाडोसच्या मैदानावर तब्बल १७ वर्षांनी भारतीय संघाने इतिहास रचला. १७ वर्षानंतर भारत टी २० वर्ल्डकपचा विजेता ठरला. भारताने २००७ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टी २० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती. आता पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकून भारतीय टीमने संपूर्ण देशाला एक मोठी भेट दिली. वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच कल्ला करण्यात आला. चाहत्यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. मात्र संपूर्ण देश जी मॅच डोळ्यात तेल घालून पाहत होता ती मॅच बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी पहिलीच नाही. त्यांनी एक पोस्ट करत त्याचं कारण सांगितलं आहे.

२०२४ चा हा विजय सगळ्यांसाठीच खूप खास होता. या विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी २०मधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. मात्र शेवटच्या काही ओव्हरमध्ये हा सामना भारताच्या हातून निसटून जाणार की काय असं चित्र होतं. सगळ्यांचे श्वास अडकले होते. मात्र देशभर सगळेच टीव्हीकडे डोळे लावून बसलेले असताना अमिताभ बच्चन मात्र सामना पाहत नव्हते. त्यांनी पोस्ट करत यामागचं कारण सांगितलं. त्यांनी ट्वीट करत लिहिलं, 'डोळ्यातून वाहणारे अश्रू... त्या अश्रूंसोबत जे आता टीम इंडियाच्या डोळ्यातून वाहत आहेत. वर्ल्ड चॅम्पियन इंडिया.'

त्यांनी पुढे लिहिलं, 'किती उत्सुकता, शंका... सगळं झालं आणि संपलं. मी टीव्ही पाहिला नाही. माझ्याने पाहावला गेला नाही... जेव्हा मी पाहतो तेव्हा आपण हरतो! डोक्यात दुसरं काही येत नाहीये. फक्त टीमच्या अश्रूंसोबत माझ्या डोळ्यातही अश्रू आहेत.' अमिताभ यांच्या या ट्वीटवर काही नेटकऱ्यांनी त्यांची बाजू घेतली आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं, असं म्हणत त्यांनी बिग बींना पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT