Amitabh Bachchan & Rajinikanth Esakal
Premier

Video : थलाईवा बिग बींच्या पाया पडायला जाताच अमिताभ यांनी केली 'ही' कृती ; व्हिडिओची होतेय चर्चा

Rajinikant tried to touch Amitabh Bachchan feet : थलाईवा रजनीकांत यांनी अनंत-राधिकाच्या लग्नात अमिताभ यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमिताभ यांनी केलेल्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सकाळ डिजिटल टीम

Amitabh Bachchan & Rajinikanth : अनंत आणि राधिका मर्चंटच्या राजेशाही लग्नानंतर त्यांचा शुभ आशीर्वाद हा कार्यक्रमही थाटात पार पडला. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावत नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेते अमिताभ बच्चन आणि थलाईवा रजनीकांत यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रजनीकांत यांनी अमिताभ यांचे घेतले आशीर्वाद

इंस्टाग्रामवर या सभारंभाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होतेय. या व्हिडिओमध्ये रजनीकांत बिग बींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अमिताभ यांनी त्यांच्या हाताला पकडून त्यांना वर उचललं आणि त्यांना मिठी मारली. या दोघांच्याही या कृतीच कौतुक होत आहे. रजनीकांत आणि अमिताभ यांचा नम्रपणा आणि एकमेकांविषयी वाटणारा आदर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय.

अमिताभ यांनी रंगीबेरंगी शेरवानी यावेळी घातली होती तर रजनीकांत यांनी पांढऱ्या रंगाचा सदरा आणि लुंगी असा दाक्षिणात्य पद्धतीचा पोशाख केला होता. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी कमेंट करत त्यांच्या नम्रपणाचं कौतुक केलं.

या सोहळ्यात अमिताभ आणि रजनीकांत यांच्याबरोबरच अमिताभ यांची सून ऐश्वर्या, नात आराध्या आणि नव्या नवेली सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त सलमान खान, शाहरुख खान, सुहाना खान, सारा अली खान, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, संजय दत्त, अजय देवगण, हेमामालिनी, शनाया कपूर, दिशा पटनी, ख़ुशी कपूर, सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, मेरी कोम हे सेलिब्रिटीजही सहभागी झाले होते.

आज अनंत-राधिकाच्या लग्नाचा शेवटचा कार्यक्रम पार पडणार आहे. शुभ उत्सव असं या कार्यक्रमाचं नाव असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पार्टी आणि रिसेप्शन जिओ कॉनव्होकेशन सेंटरमध्ये पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केला १४ सदस्यीय संघ; दुखापतीचा फटका, तरी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी

Viral News : खेळता खेळता ५ वर्षांच्या मुलीने गिळलं ५० ग्रॅम सोनं; डॉक्टरांनी असं काढलं बाहेर!

Marathi News Live Updates : जयपूरमध्ये आशुतोष रांका यांच्यावर हल्ला; ‘भाजपच्या गुंडांकडून सीजेपी कार्यकर्त्यांना मारहाण’ - अभिजीत दिपके यांचा आरोप

Mumbai News: पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाचा दिलासा, सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जनाचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT