Amitabh Bachchan esakal
Premier

Amitabh Bachchan: 'आकाशाची सावली'; महानायक अमिताभ बच्चन यांनी लताजींवर केली मराठीत कविता

Amitabh Bachchan: अमिताभ यांनी मंगेशकर कुटूंबाचे आभार मानणार भाषण केलं आणि यावेळी त्यांनी आकाशाची सावली नावाची मराठी कविता सादर केली.

priyanka kulkarni

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना नुकतंच त्यांच्या अभिनयक्षेत्रातील योगदानासाठी मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणाऱ्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार गेल्या तीन वर्षांपासून देण्यात येतो. काल म्हणजे एप्रिल २०२४ ला हा पुरस्कार सोहळा पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. हा पुरस्कार स्वीकारताना अमिताभ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

अमिताभ यांनी मंगेशकर कुटूंबाचे आभार मानणार भाषण केलं आणि यावेळी त्यांनी आकाशाची सावली नावाची मराठी कविता सादर केली. ही कविता त्यांनी स्वतः त्यांच्या मित्राच्या मदतीने मराठीत लिहिली. आकाशाची सावली असं या कवितेचं नाव असून सोशल मीडियावर त्यांनी त्यांच्या या कवितेचा फोटो शेअर केला. लता मंगेशकर यांच्यावर ही कविता त्यांनी केली असून त्यांच्या लता यांच्याविषयीच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

अमिताभ यांची कविता:

काळाच्या, ज्वलन्त वाळूयर अनवाणी चालत होतो,

पुढच्या पाउली पलीकडे पाहण्यास अक्षम... कारण काय कि ते अशक्य होते... वेळच नव्हता...

तेव्हा कर्तव्यच उद्देश होते आणि कर्तव्यच कर्म होते हेतु काय... कर्तृत्व काय... सिद्धी काय... सगळे एकच होते....

अशा प्रकारे आयुष्य जात असताना... त्या रणरणत्या उन्हात... आकाशाची एक सावली मला लाभली... त्या आकाशाचे नाव... लता मंगेशकर....

माझ्या करिता लता दीदी चे स्वर हाच संगीताचा परिचय होता.. हीच संगीताची परिभाषा होती.... हीच संगीताची व्याख्या होती....

लता दीदी म्हणजेच संगीत, आणि संगीत म्हणजेच लता दीदी... माझ्या करिता समानार्थी शब्द आहेत दोन्ही...

सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या कवितेचं खूप कौतुक होतंय. अमिताभ लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटूंबाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,"इतका मोठा पुरस्कार मिळणं ही सौभाग्याची गोष्ट आहे. मी कधीच स्वत:ला या पुरस्कारसाठी योग्य मानलं नाही. हृदयनाथ मंगेशकरांनी मागच्या वर्षीसुद्धा बोलावलं होतं, पण मी तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं. खरं, तर मी चांगला होतो, पण मला यायचं नव्हते. या वर्षी माझ्याकडे कोणते कारण नसल्यानं त्यांचं आमंत्रण स्वीकारावं लागलं. लताजींनी माझ्या कुटुंबावर नेहमीच प्रेम केलं. त्यांच्याकडून आम्हाला मिळालेल्या आदराचं वर्णन शब्दांत करू शकणार नाही."

दरवर्षी मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.यावेळी अमिताभ बच्चन, अशोक सराफ, मंजिरी फडके, पद्मिनी कोल्हापुरे, रुपकुमार राठोड, अतुल परचुरे, रणदीप हुडा यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT