Amitabh Bachchan Letter to Radhika Madan sakal
Premier

Amitabh Bachchan:राधिकाच्या अभिनयावर 'बिग बी' झाले फिदा; पत्र लिहित केले कौतुक

Radhika Madan: मी आणखी कठोर परिश्रम करेन आणि माझ्या प्रेक्षकांचे आणखी प्रामाणिक परफॉर्मन्स देऊन मनोरंजन करेन.

Chinmay Jagtap

Amitabh Bachchan Letter to Radhika Madan: राधिका मदानने अंग्रेजी मीडियम या चित्रपटात साकारलेल्या अप्रतिम भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांनी राधिकाचे कौतुक केले आहे. यासाठी त्यांनी एक पत्र पण लिहीले आहे.

पत्रात अमिताभ बच्चन यांनी लिहीले आहे की, "मी तुम्हाला 'अंग्रेजी मीडियम' मधील केलेल्या कामाबद्दल कौतुकाने हे पत्र लिहित आहे. मी काल हा चित्रपट पाहिला. मला तुमचं काम खुप आवडलं आणि तुम्हाला पत्र लिहिण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही.' तुम्ही परिपक्व अभिनय केला आहे. तुम्हाला समृद्धी आणि यश मिळो.

अमिताभ बच्चन यांच्या बोलण्याने भारावून गेलेल्या राधिका मदानने पत्राला उत्तर देताना लिहिले की, "मला काय बोलावे किंवा लिहावे हे कळत नाहीये.मी अवाक झाली आहे आणि खूप भारावून गेले आहे. तुमच्या कौतुकाची थाप मिळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी नेहमीच कल्पनाकायची की माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माझ्या दारावरची बेल वाजेल आणि बाहेर उभी असलेली एक व्यक्ती म्हणेल, 'अमिताभ बच्चन सरांनी तुमच्यासाठी फुले आणि एक नोट पाठवली आहे' आणि त्यानंतर लगेचच मी बेशुद्ध पडेन.

Amitabh Bachchan Letter to Radhika Madan

"सुदैवाने मला ते मिळाले तेव्हा मी बेशुद्ध झाले नाही. मी फक्त काही सेकंदांसाठी उभी राहिले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही माझे स्वप्न साकार केल्याबद्दल धन्यवाद. मी आणखी कठोर परिश्रम करेन आणि माझ्या प्रेक्षकांचे आणखी प्रामाणिक परफॉर्मन्स देऊन मनोरंजन करेन.

राधिका मदान ही बॉलीवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या, सरफिरामधील तिच्या राणीच्या भूमिकेचे खुप कौतुक होत आहे. यात तिने अक्षय कुमारसोबत काम केले आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित, या चित्रपटात राधिका एका महाराष्ट्रीयन मुलीच्या भूमिकेत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT