Amitabh Bachchan esakal
Premier

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमुळे नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Amitabh Bachchan BJP Aaditya Thackeray : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. अशातच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशताच आता नुकतेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमुळे नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

बिग बींचे ट्वीट

बिग बी यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "अरेरे! कामाला निघालो...सी लिंक नंतर कोस्टल रोड आणि अंडरग्राउंड टनल.. JVPD, जुहू ते मरीन ड्राइव्ह, 30 मिनिटे! वाह ! क्या बात है ! स्वच्छ रस्ता आणि कोणताही अडथळा नाही."

आदित्य ठाकरे आणि भाजपमध्ये वाद

बिग बी यांनी शेअर केलेल्या कोस्टल रोडच्या ट्वीटला बीजेपीनं रिप्लाय केला, "आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है… धन्यवाद अमिताभ बच्चन जी, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड टनल मधून तुम्ही प्रवास केलात याचा आम्हाला आनंद आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि राज्याचे विकासपुरुष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय. भविष्यातदेखील मुंबईकरांना आणि राज्यातील जनतेला उत्तम दर्जाचे रस्ते आणि पायाभूत सोयीसुविधा मिळणार हीच मोदीजींची गॅरंटी."

आदित्य ठाकरे म्हणतात,कोस्टल रोड प्रकल्पाशी भाजपचा काहीही संबंध नाही.

भाजपच्या या ट्वीटवर आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, कोस्टल रोड प्रकल्पाशी भाजपचा काहीही संबंध नाही. त्यांनी ट्वीटमध्ये कोस्टल रोडबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,"कोस्टल रोडचे श्रेय भाजप महाराष्ट्राने घेतले हे पाहणे हास्यास्पद आहे.कोस्टल रोड हा एक प्रकल्प आहे ज्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, शिवाय त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यासाठी 2 वर्ष उशिर केला. कोस्टल रोड प्रोजेक्टची घोषणा आणि अंमलबजावणी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. स्वत:हून न केलेल्या कामांसाठी नेहमीप्रमाणेच श्रेयासाठी हताश असलेल्या भाजपने अमिताभ बच्चन सरांचे ट्वीट रिट्वीट केलं."

"भाजप श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकतो, पण हे घडवून आणणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत हे मुंबईकरांना माहीत आहे.", असंही उद्धव ठाकरेंनी ट्वीटमध्ये लिहिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT