Amitabh Bachchan esakal
Premier

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी शेअर केला शाळेतला तब्बल ७० वर्षांपूर्वीचा फोटो, तुम्ही बिग बींना ओळखलंत का?

Amitabh Bachchan Childhood Photo: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांचा शाळेतला फोटो शेअर केला आहे. अनेकांनी बिग बींना ओळखलं आहे.

Payal Naik

Amitabh Bachchan School Photo: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात. बिग बी सध्या ८१ वर्षांचे आहेत. मात्र त्यांचा कामातील उत्साह हा एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. नुकतेच ते 'कल्की' या चित्रपटात दिसले होते. आता पुन्हा एकदा बिग बी एका कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अमिताभ यांनी यावेळी त्याने एक न पाहिलेला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे जो त्यांच्या शाळेच्या वेळेतील आहे. म्हणजे तब्बल 70 वर्षांपूर्वीचा आहे. तरीही त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ओळखलं आहे.

हा फोटो अमिताभ बच्चन यांच्या शाळेतील त्या दिवसाचा आहे जेव्हा ते स्काउट्सचा एक भाग असायचे. ते अलाहाबादमधील शाळेत शिकले आणि त्यांचा संघ जिंकला तेव्हा तो अभिमानाचा क्षण त्यांनी कॅमेरात टिपला होता. त्यातलेच हे फोटो आहेत. अमिताभ बच्चन यांनी दोन फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी एका फोटोमध्ये ते स्वत: आहेत आणि दुसऱ्यामध्ये ते ग्रुपसोबत उभे आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, 'बॉय स्काउट्सचे ते चांगले जुने दिवस.. स्पेशल स्कार्फ.. बॅज.. स्पेशल सॅल्युट.. त्याचे संस्थापक बॅडेन पॉवेल.. आणि त्यातील किती धडे अजूनही चालू आहेत.' या फोटोंमध्ये अमिताभ वरून दुसऱ्या रांगेत उजवीकडून चौथे उभे आहेत.

अमिताभ यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असं म्हटलं जातं की बिग बी त्यांच्या शाळेतील हुशार विद्यार्थी होते. काही वर्ष त्यांनी नैनिताल येथेही शिक्षण घेतलं. त्यानंतर १९६२ मध्ये त्यांनी मुंबईतील करोडीमल कॉलेजमध्ये डिग्री पूर्ण केली. हा शाळेतला हुशार मुलगा पुढे जाऊन बॉलिवूडचा महानायक होईल याचा अंदाज तेव्हा कुणीही लावला नसेल. अमिताभ यांचा 'कल्की' अजूनही सिनेमागृहात धुमाकूळ घालतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT