Deepika Kakar Esakal
Premier

Amitabh & Rekha : अमिताभ- रेखा यांचा सिलसिला आता छोट्या पडद्यावर ; टेलिव्हिजनवरील 'ही' लोकप्रिय जोडी दिसणार मुख्य भूमिकेत

Silsila Movie's Serial Remake On Television : अमिताभ, जया आणि रेखा यांचा गाजलेला सिनेमा 'सिलसिला' याचा आता हिंदी मालिकेमध्ये रिमेक होतोय. या मालिकेत कोण कलाकार काम करणार जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

Silsila Serial : सत्तरच्या दशकात रिलीज झालेला यश चोप्रा दिग्दर्शित 'सिलसिला' हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. अमिताभ रेखा आणि जया यांचे मुख्य भूमिका असेल हा सिनेमा खूप गाजला होता. एक रियल लाईफ लव स्टोरी या सिनेमाच्या निमित्ताने रील लाईफ मध्ये पाहायला मिळाली अशी चर्चाही त्याकाळी रंगली होती. आता हा गाजलेला सिनेमा मालिकेच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमावर आधारित नवीन मालिका लवकरच सुरू होते.

विशेष म्हणजे या सिनेमाच्या मालिकारूपातील रिमेकमध्ये टेलिव्हिजनवरील गाजलेली रील आणि रियल लाईफ जोडीने काम करावं अशी निर्मात्यांची इच्छा आहे. अभिनेता शोएब इब्राहिम आणि अभिनेत्री दीपिका कक्कर या दोघांना या मालिकेत काम करण्यासाठी विचारलं जाणार असल्याचं म्हंटलं जातंय पण याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अपडेट समोर आली नाहीये. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार, टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध निर्माते संदीप सिकंद या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ते लवकरच या जोडीसमोर या मालिकेसाठी प्रस्ताव ठेवणार असून त्यांच्या मते प्रेक्षक या रियल लाईफ जोडीची ऑनस्क्रीन लव्हस्टोरी पाहणं प्रेक्षक जास्त पसंत करतील.

या आधी दीपिकाने संदीप सिकंद यांच्या मालिकेत काम केलं आहे. तिने त्यांच्या 'कहा हम कहा तुम' या मालिकेत काम केलं होतं. ही मालिका टेलिव्हिजनवर बरीच गाजली होती. दीपिकाबरोबर करण ग्रोव्हरने स्क्रीन शेअर केली होती.

दरम्यान, दीपिकाने तिचा मुलगा रुहानच्या जन्मापूर्वी एका व्लॉगमध्ये ती अजून एक-दोन वर्षं काम करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. तिला तिच्या मुलाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा होता आणि म्हणूनच तिने काही अभिनयक्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता पण आता या मालिकेनिमित्त दीपिका पुन्हा टेलिव्हिजनवर काम करायला तयार होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दीपिकाने शोएबबरोबर कलर्स टीव्हीवरील 'ससुराल सिमर का' या मालिकेत काम केलं होतं आणि ही मालिका खूप गाजली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT