Premier

Amruta Khanvilkar: अमृता रंगमंचावर करणार भव्य नाट्यपदार्पण, शेयर केलेला टीझर पाहिलात का?

Bollywood Marathi News: अमृतकला स्टुडिओज निर्मित 'वर्ल्ड ऑफ स्त्रीचा प्रीमियर होणार आहे.| Amrita Khanwilkar Makes Grand Debut in World of Stree Dance Musical

Chinmay Jagtap

Latest Marathi Film Industry News: आपल्या अभिनयाने आणि नृत्याने कित्येक प्रेक्षकांची मन जिंकणारी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नवा प्रवास सुरु केला आहे. "वर्ल्ड ऑफ स्त्री" या नृत्य संगीतात तिने भव्य नाट्यपदार्पण करणार आहे.

थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याचे तिचे दीर्घकाळचे स्वप्न होते. ते या निमित्ताने पूर्ण होणार आहे. अमृताच्या आगामी " वर्ल्ड ऑफ स्त्री " मधून शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल यातून अनुभवयाला मिळणार आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, 'वर्ल्ड ऑफ स्त्री ‘ मध्ये अमृता सोबत डान्स गुरु आशिष पाटील करणार आहे. 10 अफलातून नर्तकांची प्रतिभावान टीम त्यांच्या सोबत असणार आहे. 90 मिनिटांचा लाइव्ह ऑडिओ-व्हिज्युअल परफॉर्मन्स या ठिकाणी करण्यात येणार आहे. भक्ती (भक्ती), सौंदर्य (श्रृंगार) आणि डायनॅमिक एनर्जी (शिवशक्ती) च्या थीम्स नुसार हे सादरीकरण असणार आहे. अमृता एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांना माहीत आहे पण तिच्या नृत्य अविष्कराची अनोखी बाजू वर्ल्ड ऑफ स्त्री मधून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे.

अमृताने याआधी एक पोस्टर तिच्या सोशल मीडिया वरून शेयर केलं होत आणि आता अमृताने 'वर्ल्ड ऑफ स्त्री 'चा टीझर लाँच केला आहे. अर्थ एनजीओ आणि आशिष पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतकला स्टुडिओज निर्मित 'वर्ल्ड ऑफ स्त्रीचा प्रीमियर 24 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे.

या विषयी लिहीतांना आमृताने म्हटले आहे की, "नृत्य हा कायमचं माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वर्ल्ड ऑफ स्त्री च्या निमित्तानं नाट्य नृत्य आणि संगीत यांची अनोखी सांगड घालून ही एक मैफिल प्रेक्षकांना देणं हे माझ्यासाठी स्वप्न होत आणि ते पूर्ण होतंय ! आशिष पाटील अर्थ एनजीओ यांच्यासोबत सहकार्य करून आणि कथ्थक नर्तकांची एक अत्यंत कुशल टीम सोबत घेऊन हा नवा प्रवास सुरू करणं माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे"

लाइव्ह परफॉर्म करण्याबद्दल तिची उत्सुकता व्यक्त करताना अमृताने म्हणते " मी कायम प्रेक्षकांना काय हवंय हे देण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत आणि नृत्य कार्यक्रमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वर्ल्ड ऑफ स्त्री रंगमंचावर घेऊन येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कमालीचे व्हिज्युअल, भावपूर्ण संगीत आणि मनमोहक नृत्य सादरीकरणासह प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि त्यांना मंत्रमुग्ध करणे हेच आमचं ध्येय आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO House: सिडकोचं घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार! दररचनेत बदल करण्याचे निर्देश, राज्य सरकारचं मोठं पाऊल

Year End : गुगलवर सर्च झालेल्या सगळ्यांत वाईट गोष्टी कोणत्या? 2025 वर्षातील धक्कादायक रिपोर्ट लिक

Latest Marathi News Live Update : वलसाडच्या उंबरगाव तालुक्यातील गावात प्लास्टिक कारखान्याला भीषण आग

Vidhan Bhavan ruckus case : विधानभवनात आव्हाड अन् पडळकर समर्थकांच्या राडा प्रकरणी अहवाल सादर

Railway Food: एअरलाईन्ससारखे ताजे अन्न आता ट्रेनमध्ये मिळणार! आयआरसीटीसीकडून मोठी सुधारणा; पण काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT