Amrita Pandey esakal
Premier

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; जगाचा निरोप घेण्याआधी ठेवले होते 'हे' व्हॉट्सॲप स्टेटस

Amrita Pandey: अमृत ही तिच्या बिहारमधील भागलपूर येथील घरात मृतावस्थेत आढळली.

priyanka kulkarni

Amrita Pandey: भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता पांडेचे (Amrita Pandey) निधन झाले आहे. अमृताने आत्महत्या केली आहे, असं म्हटलं जात आहे. पण सध्या तिच्या निधनाचा पोलीस तपास करत आहेत. अमृत ही तिच्या बिहारमधील भागलपूर येथील घरात मृतावस्थेत आढळली. अमृताने अभिनेता खेसारी लाल यादव यांच्यासोबतही काम केले आहे.

निधनाआधी ठेवले होते 'हे' व्हॉट्सॲप स्टेटस

अमृताच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. निधनापूर्वी तिने व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते. त्यात तिनं लिहिलं होतं,"दो नाव पर सवार है उसकी जिंदगी, हमने अपनी नाव डुबा कर उसकी राह को आसान कर दिया." अमृतानं हे स्टेटस का आणि कुणासाठी ठेवलं होतं? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पोलीस करतायत अमृताच्या मृत्याचा तपास

अमृताच्या मृत्यूची माहिती मिळताच जोगसर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची एफएसएलद्वारे तपासणी केली. त्यांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन आणि अमृताच्या इतर वस्तू जप्त केल्या आहेत.

अमृता करत होती डिप्रेशनचा सामना

अमृताच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, अमृताला फारसे काम मिळत नसल्याने तिला नैराश्य आले होते.अमृताला तिच्या करिअरची काळजी वाटत होती. डिप्रेशनवर ती उपचार घेत होती.

अमृता ही मुंबईमध्ये तिचे पती चंद्रमणी झांगड या ॲनिमेशन इंजिनीअरसोबत राहत होती. ती 18 एप्रिल रोजी तिच्या बहिणीच्या लग्नासाठी भागलपूरला गेली होती. लग्नानंतर तिचा नवरा मुंबईमधील घरी परतला पण अमृताने भागलपूरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

अमृतानं 'या' चित्रपटात केलं काम

'दीवानापन' चित्रपटामध्ये अमृतानं खेसारी लाल यादवसोबत काम केलं. तिने हिंदी चित्रपट, टीव्ही शो आणि वेब सीरिजमध्येही काम केले. 'परिशोध' या वेबसिरीजमधील भूमिकेसाठीही ती ओळखली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: ''दरी मिटवायची..? दिवाळीच्या फराळाएवढं हे सोपं नाही'', पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर हाके काय म्हणाले?

Pune News : ट्रस्टच्या जागेत जैन मंदिरच! धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला अहवाल

Nilesh Ghaywal : नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी केला पत्रव्यवहार

8th pay commission: जेवढा उशीर तेवढा फायदा! एकरकमी मिळणार 6,00,000 रुपये, किती असेल फिटमेंट फॅक्टर?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT