anant radhika wedding  sakal
Premier

Anant Radhika Wedding: मराठी सिनेस्टार होणार अंबानींचे पाहुणे! 'या' दोन कलाकारांना मिळालं अनंत राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण

Marathi Actors Got Ambani Invitation Card: मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकारांना अनंत आणि राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं आहे. कोण आहेत ते दोघं.

Payal Naik

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांच्या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. अनंत आणि राधिका १२ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची जोरदार तयारी केली आहे. हे लग्न मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. लग्नासाठी झेड प्लस सेक्युरिटी ठेवण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास जेटची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यातच आता दोन मराठी कलाकारांचा देखील नंबर लागला आहे. मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकारांना अनंत आणि राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं आहे.

अंबानींच्या लग्नसोहळ्याचा थाट न्यारा असतो. त्यांच्या कपड्यांपासून तिथली रोषणाई सगळंच डोळे दिपवून टाकणारं असतं. त्यांच्या जवळच्या आणि खास पाहुण्यांना या लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. यात आता दोन मराठी कलाकारही आहेत. मराठी अभिनेता श्रेयस राजे याने स्टोरी शेअर करत आपल्याला लग्नाचं आमंत्रण मिळाल्याचं सांगितलं होतं. श्रेयस सध्या 'चारचौघी' या नाटकात मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्याला या लग्नाची पत्रिका देण्यासही अंबानींचा माणूस खास अँटिलीयाहून घोडबंदर रोडला आला होता. आता पत्रिका मिळाली तर लग्नाला जावं लागेल असं त्याने लिहिलं होतं.

श्रेयसनंतर लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिलादेखील अंबानींच्या लग्नाची पत्रिका मिळाली आहे. तिला अंबानी कुटुंबाकडून लग्नसोहळ्यासाठी खास आमंत्रण असल्याचं कळतंय. अमृताने अनेक हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता तिला या लग्नासाठीही आमंत्रण मिळालं आहे. अमृता आणि श्रेयस या लग्नाला उपस्थिती लावणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातही त्यांचे आऊटफिट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पाणीटंचाईत BMC चा मोठा निर्णय! टँकरसाठी OTP प्रणाली लागू होणार; ऑनलाईन बुकिंग कसं करावं लागणार?

सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या अन् Mumbai Indians यांच्या नेमकं काय सुरू आहे? जाणून घ्या Inside Story, सूर्या टीमसोबत राहणार का?

'तुंबाडची मंजुळा' प्रेक्षकांच्या मानगुटीवर बसलीच! चार दिवसात दिवसात केली कोटींची कमाई; वाचा आकडा

Latest Marathi News Update : परभणीत अनेक एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्याने गोंधळ

वर्षाला फक्त ४ अनुदानित सिलिंडर? उज्ज्वला योजनेच्या नियमात केंद्र सरकार मोठा बदल करण्याच्या तयारीत; काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT