Amruta Khanvilkar esakal
Premier

Amruta Khanvilkar: "मी फक्त नावाने नाही तर धर्माने देखील मराठी आहे..."; ट्रोलर्सला अमृता खानविलकरचं सणसणीत उत्तर

Amruta Khanvilkar: अमृताला अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता अमृतानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

priyanka kulkarni

Amruta Khanvilkar: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकते. अमृतानं मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये देखील विशेष स्थान निर्माण केलं आहे. अमृताचे चाहते तिच्या कामाचे कौतुक करतात पण अमृताला अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशातच आता अमृतानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

अमृताची पोस्ट

अमृतानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "आशा करते तुमचा गुढी पाडवा छान साजरा झाला असेल. नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार. नवीन मनोकामना, नवी स्वप्ने, देवा चरणी ठेऊन ती पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना केली असणार. जर तुम्ही हे सगळं केलय तर तुमच्या सारखीच मी सुद्धा आहे मी ही हेच केलं. कारण मी देखील फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे. संस्काराने मराठी आहे. मूळची कोंकणातील, पण जन्म मुंबईचा आहे, मी हि कोणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे, मावशी आहे, ताई आहे, मैत्रीण आहे, बायको आहे आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्या मुळे मी एक अभिनेत्री आहे"

"तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेग वेगळे interviews देत आहे. वेग वेगळ्या प्लॅटफॉर्म्स वर, आता ह्या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे. पण ट्रॉलिंगच्या नावा खाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते.वेशभूषा असो, हसणं असो, बोलणं असो, एका स्त्रीच्या प्रतेय्क गोष्टी वर किती, किती बोलायचं ? आणि त्याला काही सीमा का नाहीये ? जे लोक स्वतःचं खरं नाव किंव्हा साधा DP सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात ? मज्जा वाटते तुम्हाला ? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे. सोशल मीडिया चा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये .... पण ह्या वर जे तुम्ही लिहिता ... बोलता .... ह्यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात.", असंही अमृतानं पोस्टमध्ये लिहिलं.

पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, "असो, मी normally ह्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करतेच . पण कधी कधी समोरच्या ला हे सांगणं गरजेचं असतं कि गप्प राहणं हे दुबळेपण नाही तर ताकत आहे. अमृता खानविलकर"

अमृतानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमृताची 'लुटेरे' ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. अमृताच्या वाजले की बारा आणि चंद्रा या लावणीनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT