Amruta Khanvilkar|Sanjay Leela Bhansali Esakal
Premier

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची संजय लीला भन्साळींसाठी खास पोस्ट; म्हणाली...

Amruta Khanvilkar: अमृतानं नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

priyanka kulkarni

Amruta Khanvilkar: सध्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) हे त्यांच्या हिरामंडी (Heeramandi) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. ही वेब सीरिज लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अशातच अगदी नवाबी थाटात हिरामंडी या वेब सीरिजचा प्रीमियर सोहळा काल मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. तसेच अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) देखील या सोहळ्यात चार चाँद लावले. अमृतानं नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

अमृतानं शेअर केला फोटो

काही दिवसापूर्वी झालेल्या मुलाखतीमध्ये अमृताने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तिने हिरामंडी या वेब सीरिजच्या प्रीमियर सोहळ्यातील संजय भन्साळी यांच्या सोबतचा एक फोटो आज सोशल मीडिया वर पोस्ट करून त्याला खास कॅप्शन सुद्धा दिलं आहे.

अमृतानं फोटोला कॅप्शन दिलं, "about last night वन अँड ओन्ली संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीच्या प्रीमियरमध्ये हजेरी लावली, असे अनुभव तुमचे सर्व प्रयत्न सार्थकी लावतात, तुम्हाला शुभेच्छा सर. महेश लिमये तुम्ही खरे जादूगार आहात आणि तुम्ही कॅमेरासोबत जे ते एखाद्या पेंटिंग सारखं आहे.आशिष पाटील, क्रेडिट लिस्टमध्ये तुझे नाव पाहणे ही अभिमानाची गोष्ट आहे."

अमृता संजय लीला भन्साळीसोबत कधी काम करणार? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कायम चर्चेत राहणारी अमृता ही झाकीर खानसोबत एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

कधी रिलीज होणार हिरामंडी?

संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही वेब सीरिज एक मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT