Marathi actors friendship  esakal
Premier

Friendship Day 2024: कोण म्हणत मराठी कलाकारांचं पटत नाही? सिनेसृष्टीतील हे स्टार्स आहेत एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स

Best Friedns In Marathi Industry: मराठी सिनेसृष्टीतही अनेक कलाकार आहेत जे एकमेकांचे मित्र आहेत. अनेकदा ते एकत्र मजा मस्ती करताना दिसतात.

Payal Naik

दोन कलाकार एकमेकांचे खास मित्र असू शकत नाहीत त्यांच्यात फक्त स्पर्धा असते असं म्हणतात. पण मराठी मनोरंजन सृष्टीतील चित्र काहीसं वेगळं आहे.इथे अनेक असे कलाकार आहेत जे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते एकमेकांचे मित्र झाले आणि ती मैत्री कायमची टिकली. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. आज ४ ऑगस्ट रोजीही तो साजरा केला जातोय. पाहूया मराठी सिनेसृष्टीतील अशाच एकही बेस्ट फ्रेंड्सच्या जोड्या.

Marathi actors friendship

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट

लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री प्रिया बापट या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांनी 'वजनदार' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांची मैत्री झाली ती कायमचीच.

Marathi actors friendship

पूजा सावंत, वैभव तत्ववादी आणि भूषण प्रधान

लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता वैभव तत्ववादी आणि भूषण प्रधान हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय त्रिकुट आहे. त्यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यांनी एकत्र कोणत्याही चित्रपटात काम केलं नसलं तरी त्यांची मैत्री मात्र अनेक वर्षांपासूनची आहे.

Marathi actors friendship

सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे

सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे हे एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. पुण्यात एका नाटकात काम करताना त्यांची ओळख झाली. आज दोघेही नावाजलेले कलाकार आहेत. आजही त्यांची मैत्री कायम आहे.

Marathi actors friendship

स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित

स्वप्नील आणि तेजस्विनीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. ते दोघे 'तू ही रे' चित्रपटात एकत्र दिसले होते. स्वप्नील प्रेमाने तेजस्विनीला बंड्या म्हणून हाक मारतो.

Marathi actors friendship

स्वप्नील जोशी - सई ताम्हणकर

अभिनेता स्वप्नील जोशी हा तेजस्विनीप्रमाणे सई ताम्हणकरचा देखील तितकाच चांगला मित्र आहे. त्यानी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

Marathi actors friendship

अमृता खानविलकर- सोनाली खरे

अमृता खानविलकर आणि सोनाली खरे या दोघी एकमेकींच्या खूप घट्ट मैत्रिणी आहेत. त्या नेहमी एकमेकींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अनुजा साठे, अभिज्ञा भावे आणि रेश्मा शिंदे

अनुजा साठे, अभिज्ञा भावे आणि रेश्मा शिंदे

अनुजा साठे, अभिज्ञा भावे आणि रेश्मा शिंदे या तिघींनी 'लगोरी' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. अजूनही त्या तिघी खूप जवळच्या मैत्रिणी आहेत.त्या तिघींचे फोटो आणि व्हिडीओ त्या नेहमी शेअर करत असतात.

marathi actress

उर्मिला कानेटकर- क्रांती रेडकर

क्रांती आणि उर्मिला यांची मैत्री खूप जुनी आहे. एका गैरसमजापासून सुरू झालेली ही मैत्री आता अनेक वर्ष टिकून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT