dhamaveer 2 kedar dighe on eknath shinde  sakal
Premier

Dharmaveer 2: कधीपर्यंत साहेबांच्या मृत्यूचं राजकारण करणार? 'धर्मवीर २' वरून केदार दिघे यांचा शिंदेंना थेट सवाल

Kedar Dighe On Eknath Shinde: 'धर्मवीर २' या चित्रपटावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. केदार दिघे यांनी आता मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.

Payal Naik

शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार आहे असं सांगण्यात येतंय. आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे भाग दोन मध्ये दाखवण्यात येणार असल्याचं शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र आता 'धर्मवीर २' या चित्रपटावर खुद्द आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शिंदे आणखी किती दिवस दिघे साहेबांच्या मृत्यूचं राजकारण करणार असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

केदार दिघे हे आनंद दिघे यांचा लहान भाऊ अनंत दिघे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी आता 'धर्मवीर २' च्या ट्रेलरवरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले आहेत. मुलाखतीत बोलताना केदार म्हणाले, 'मधल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये शिंदेंनीच असं सांगितलं होतं की दिघे साहेबांचा मृत्यू कशामुळे झाला. तो हार्ट अटॅकमुळे झाला असं ते म्हणाले होते. हे त्यांच्या तोंडातून आलं होतं. त्याची एक क्लिपदेखील आहे. मग हे जर का तुम्ही त्यावेळेला सांगितलं तर आता निवडणुकीच्या वेळेला आणि अगोदर तुमच्या नेत्यांनी मध्येच काही स्टेटमेंट दिलं की दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ बाहेर काढू. याचा अर्थ काय? तुम्हाला काय म्हणायचंय?'

पुढे ते म्हणाले, '२२ वर्ष तुम्ही साहेबांच्याच मृत्यूचं राजकारण करत राहणार? ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी. मग तुमच्या या दैवतावर, तुम्हाला ज्यांनी घडवलं त्या नेत्यावर अन्याय होत होता मग तुम्ही मागील २२ वर्ष गप्प का बसलात? ' असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. दरम्यान 'धर्मवीर २' मधील अनेक संवाद हे नेटकऱ्यांना देखील खटकले होते. आघाडी झाली तेव्हा आनंद दिघे हयात नव्हते मग चित्रपटात त्यांच्या तोंडी ते संवाद कसे असे प्रश्नही प्रेक्षकांनी उपस्थित केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT