dharmaveer 2 sakal
Premier

Dharmaveer 2: 'धर्मवीर २' ट्रेलरची जोरदार हवा पण नेटकऱ्यांमध्ये रंगली 'त्या' डायलॉग्सचीच चर्चा; म्हणतात- त्या प्रश्नाचं उत्तर...

Dharmaveer 2 Viral Dialogues: लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक याच्या 'धर्मवीर २' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

Payal Naik

धर्मवीर म्हणून जनमानसात लोकप्रिय असलेले शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. यात आनंद दिघे यांचा संघर्ष दाखवण्यात आला होता. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग 'धर्मवीर २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दिघे साहेबांचं हिंदुत्व दाखवण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या चित्रपटाचा ट्रेलर आता सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होतोय. त्यातही या चित्रपटाच्या डायलॉग्सनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या ट्रेलरवर प्रेक्षकांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकरी या ट्रेलरचं कौतुक करत आहेत. प्रेक्षकांना प्रसाद ओकचा अभिनय अतिशय आवडला आहे. आताही प्रसादने या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे असं म्हणत नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. तर या चित्रपटातील काही डायलॉग नेटकऱ्यांना खटकताना दिसत आहेत. या चित्रपटातील डायलॉग आता व्हायरल होत आहेत. 'कुणाशीतरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग', 'नेता स्वतःच्या घरात नाही दुसऱ्याच्या दारात चांगला दिसतो', 'एक दाढीवाला बेसावध होता पण दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला', 'तुमचं हिंदुत्व म्हणजे काय आहे?' हे संवाद सध्या प्रेक्षकांच्या तोंडावर आहेत.

तर दुसरीकडे या चित्रपटात तरी दिघे साहेबांच्या मृत्यूचं कोडं सुटणार का असा प्रश्न नेटकरी विचारताना दिसतायत. दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर या चित्रपटात मिळणार का हे पाहण्यासाठी नेटकरी आतुर आहेत. ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. आता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर काय जादू करणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. हा चित्रपट ९ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT