Anant Ambani And Radhika Merchant sakal
Premier

Anant Ambani And Radhika Merchant Wedding: मुहूर्त ठरला! 'या' दिवशी अनंत अंबानी आणि राधिका बांधणार लग्नगाठ, पत्रिकेचा फोटो व्हायरल

Anant Ambani And Radhika Merchant: अनंत आणि राधिका यांच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

priyanka kulkarni

Anant Ambani And Radhika Merchant Wedding: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत हा राधिका मर्चेंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन जामनगर येथे मार्च महिन्यात पार पडले. अशातच आता मुंबईमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. अनंत आणि राधिका यांच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पत्रिकेवर अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

'या' दिवशी अनंत अंबानी आणि राधिका बांधणार लग्नगाठ

अनंत अंबानी आणि राधिका यांचा लग्न सोहळा मुंबईत 12 जुलै रोजी बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका हे पारंपारिक हिंदू वैदिक पद्धतीने लग्न करणार आहेत.

अनंत आणि राधिका यांचा विवाह सोहळा शुक्रवार, १२ जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर शनिवार, 13 जुलै हा शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर रविवार, 14 जुलै रोजी मंगल उत्सव सोहळा असणार आहे.

लग्नसोहळ्यासाठी ड्रेस कोड

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नपत्रिकेवर लग्न सोहळ्याच्या ड्रेस कोडची माहिती देखील देण्यात आली आहे. यामध्ये विवाह सोहळ्यासाठी इंडियन ट्रेडिशनल ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे तर शुभ आशीर्वाद या कार्यक्रमासाठी इंडियन फॉर्मल हा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. तसेच मंगल उत्सव हा सोहळ्यासाठी इंडियन chic हा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.

अनंत आणि राधिकाचं सेकंड प्री-वेडिंग फंक्शन

अनंत आणि राधिका यांचे सेकंड प्री-वेडिंग फंक्शन हे एका क्रूजवर पार पडत आहे. 28 मे रोजी प्री-वेडिंग फंक्शनला आलेल्या पाहुण्यांचे क्रूजवर स्वागत करण्यात आले. त्यानंतर 29 मे रोजी वेलकम लंच थीम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आज (30 मे) एक क्रूजवर एक पार्टी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT