radhika aapte esakal
Premier

Radhika Apte: कुणीतरी येणार गं! राधिका आपटे होणार आई; बेबी बम्प फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज; चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

Radhika Apte Pregant Shared Good News: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे लवकरच आई होणार आहे. एका कार्यक्रमात तिने आपलं बेबी बम्प दाखवत गुडन्यूज दिलीय आहे.

Payal Naik

मराठी आणि हिंदी चित्रपाटांमध्ये आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री राधिका आपटे लवकरच आई होणार आहे. राधिकाने नुकतेच काही फोटोस शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. चाहतेही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एका कार्यक्रमात तिने आपला बेबी बम्प फ्लॉन्ट करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिच्या चेहऱ्यावरील गरोदरपणातील तेज पाहून चाहत्यांना दीपिका पादुकोणची आठवण झाली आहे. चाहते आता तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

राधिकाने नुकतीच तिच्या आगामी चित्रपट 'सिस्टर मिडनाईट' च्या प्रीमिअरला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने पाहिल्यान्दा आपलं बेबी बम्प दाखवलं. तिने या कार्यक्रमासाठी बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. या ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये राधिका खूप सुंदर दिलेत होती. तिच्या चेहऱ्यावरील ग्लो पाहून नेकरी तिचं कौतुक करत आहेत. लावकरच राधिकाच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

कोण आहे राधिकाच्या पती

राधिकाने २०१२ साली ब्रिटिश व्हायोलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं आहे. त्या दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं शेअर केलं नव्हतं. अनेकांनी आता तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तू किती चॅन आहेस. हे किती मस्त आहे तू गरोदर आहेस. खूप खूप शुभेच्छा तुला. अशा अनेक प्रतिक्रिया देत चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Pune News: घरगुती गॅसला स्वदेशी पर्याय; एनसीएल शास्त्रज्ञांचा देशांत पहिले यश, घरगुती एलपीजीसाठी ‘डीएमई’ गॅस तयार

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

SCROLL FOR NEXT