aniket vishwasrao sakal
Premier

Aniket Vishwasrao: थाटामाटात लग्न, दोन वर्षात घटस्फोट, पत्नीने केले मारहाणीचे आरोप; आता अनिकेत विश्वासरावने सांगितलं सत्य, म्हणतो-

Aniket Vishwasrao On Divorce: लोकप्रिय मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याने पहिल्यांदाच त्याच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे.

Payal Naik

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेला अनिकेत विश्वासराव याने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांतून प्रेक्षकांची मनं जिंकली. एक उत्तम अभिनेता म्हणून तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याने सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र तो त्याच्या चित्रपटांसोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. त्याने काही वर्षांपूर्वी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्याशी लग्न केलं होतं. मात्र काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला. स्नेहाने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. मारहाण आणि हिंसाचाराचे आरोप करत तिने कोर्टात धाव घेतली होती. आता या प्रकरणी अनिकेतने पहिल्यांदा भाष्य केलं आहे.

अनिकेतने नुकतीच 'प्लॅनेट मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, 'जर तुम्ही सत्यासाठी लढत असाल, तर तुम्ही नक्कीच माणूस म्हणून पुढे जाता. या सगळ्या कठीण काळात तुमचा देवावर विश्वास असेल, तर तुम्ही आणखी खंबीर होता. अनिकेत संपला वगैरे या गोष्टी मी ‘ऊन-पाऊस’ मालिकेपासून ऐकत आलो आहे. हा ‘वन टाइम वंडर’ आहे, एक प्रोजेक्ट करेल मग गायब होईल या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. त्यामुळे कोण काय बोलतंय याचा मला फरक कधीच पडत नाही. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपण किती खंबीर आहोत, आपली किंमत काय आहे हे आपल्याला समजतं.'

तो पुढे म्हणाला, 'मी या आयुष्यात व इंडस्ट्रीत बरेच फटके खाल्ले आहेत. त्यामुळे आता माझ्यात हा कणखरपणा आला आहे पण, माझ्यातला चांगुलपणा मी अजिबात कमी केलेला नाही. हे सगळं कर्म आहे…ज्यांनी माझ्याबरोबर चुकीच्या गोष्टी केल्या ते आता भोगत आहेत. मला या सगळ्या गोष्टींचा मानसिक त्रास झाला पण, जे झालं त्याचा आनंदच आहे. मला वकिलाच्या रुपात एक चांगला मित्र सापडला. त्याने मला सांगितलं सत्यासाठी तुला लढायचंय ना आपण करूया…त्यानंतर हायकोर्टानेच अंतिम निर्णय दिला. नेहमी असं म्हटलं जातं शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. पण, मी म्हणतो कोर्टात जायचं. बिनधास्त जायचं, न्याय आहे.'

त्याने पुढे म्हटलं, 'आपली न्यायव्यवस्था खूप चांगली आहे त्यामुळे आपण त्यावर विश्वास ठेवायचा. न्याय नक्की मिळतो” असं अनिकेत विश्वासरावने त्याच्या चाहत्यांना सांगितलं. दरम्यान, अनिकेत विश्वासराव सध्या नाटकात काम करत आहे. याशिवाय त्याचा ‘डंका’ हा चित्रपट येत्या १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT