Ankita Lokhande star in Sandeep Singh web series Amrapali  
Premier

Ankita Lokhande News : यमुनाबाईंची भूमिका गाजवल्यानंतर अंकिता साकारतेय 'ही' व्यक्तिरेखा, चाहत्यांनी केलं कौतुक

Ankita Lokhande News : अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसनंतर बड्या प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Ankita Lokhande News : अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसनंतर बड्या प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वतंत्रवीर सावरकर या तिच्या सिनेमाची सगळीकडे चर्चा असतानाच नुकतंच अंकिताने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर केली आहे. निर्माता संदीप सिंगच्या नव्या वेब शोमधून अंकिता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अंकिताच्या नव्या वेब शोचं नाव आम्रपाली असं असून निर्माता संदीप सिंगने या सिनेमाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली, पोस्टमध्ये तो म्हणाला,"अंकिता लोखंडेच्या रूपात आम्ही सादर करत आहोत सामर्थ्य, मोहकता आणि दृढतेचे प्रतीक असणारी आम्रपाली. ही मनमोहक मालिका शाही नगरवधूच्या न सांगितल्या जाणाऱ्या गाथेचा अभ्यास करते, तिच्या भावना आणि आव्हानांनी भरलेला प्रवास प्रकट करते. या मालिकेतून संगीतकार इस्माईल दरबार पुनरागमन करत आहेत."

बौद्धकालीन इतिहासात उल्लेख असलेली वैशालीनगर राज्याची नगरवधू आम्रपालीची जीवनकहाणी या वेब सिरीजमधून उलगडणार आहे. पहिल्यांदाच आम्रपाली या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची कथा वेब शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या शोची घोषणा होताच अनेकांनी कमेंट्स करत अंकिताचं कमेंट्समध्ये अभिनंदन केलं. सोबत शेअर केलेल्या पोस्टरमधील अंकिताचा लूक अनेकांना पसंत पडला. अनेकांनी कमेंट करत तिचा हा लूक आवडल्याचं म्हंटल.

स्वतंत्रवीर सावरकर या सिनेमाची सहनिर्मिती निर्माता संदीप सिंगने केली होती. या सिनेमात अंकिताने साकारलेली यमुनाबाई ही भूमिका सुद्धा खूप गाजली.त्यानंतर आता आम्रपाली या भूमिकेत अंकिताला पाहण्यासाठी सगळेचजण खूप उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चिंचपोकळीचा चिंतामणीही मार्गस्थ

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : गिरणा धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 30 सेंमीने उघडले गेले आहेत

SCROLL FOR NEXT