Janhavi And Ankita Esakal
Premier

Bigg Boss Marathi Season 5 : "जान्हवी म्हणजे घरातील मोंजोलिका" , अंकिता वालावलकरने उठवला अभिनेत्रीच्या दुतोंडीपणावर सवाल

Bigg Boss Marathi Season 5 Bhaucha Dhakka : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये अंकिता वालावलकरने जान्हवीच्या दुट्टपी वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काय म्हणाली अंकिता जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Updates : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ चर्चेत आहे. बिग बॉस मराठीचा काल तिसरा भाऊंचा धक्का दणक्यात रंगला. रितेश देशमुख यांनी घरातील सगळ्या सदस्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तर आजच्या भागात घरातील सदस्य एकमेकांना वेगवेगळे टॅग देऊन त्यांच्या चुका लक्षात आणून देणार आहेत. यावेळी अंकिताने जान्हवीला दुतोंडी म्हंटलं.

नुकत्याच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर सदस्यांबरोबर एक गेम खेळला. ज्यात सदस्यांना सिनेमाच्या नावाचे हॅशटॅग देण्यात आले होते. हे हॅशटॅग सदस्यांनी घरात त्या सिनेमाच्या नावाशी किंवा पात्राशी साधर्म्य असलेल्या सदस्यांना द्यायचे होते आणि मग डान्स करायचा होता.

प्रोमोमध्ये असं पाहायला मिळालं कि, अंकिता प्रभू वालावलकरने मोंजोलिका हा टॅग जान्हवीला देत असल्याचं जाहीर केलं. याच कारण सांगताना ती म्हणाला कि. जान्हवीचं घरातील वागणं आम्हाला कळत नाही. ती वर्षा ताईंना अपमानास्पद बोलली आणि मग दुसऱ्याच दिवशी ती त्यांचे पाय चेपत होती. हे ऐकून रितेशलाही आश्चर्य वाटलं. त्याने खरंच का ? असं विचारल्यावर सगळ्या सदस्यांनी दुजोरा दिला तेव्हा रितेश म्हणाला हा प्रवास चांगला आहे. गळ्यापासून पायापर्यंत हा प्रवास गेलाय. त्यानंतर जान्हवीने आमी जे तोमार या गाण्यावर डान्स केला.

सोशल मीडियावर हा प्रोमो चांगलाच चर्चेत आहे आणि जान्हवीच्या वागण्याचंही अनेकांना आश्चर्य वाटतंय. काहींनी जान्हवी फेक वागतेय अशी टीका केलीये तर काहींनी अंकिताने योग्य हॅशटॅग दिला असं म्हणत तिचं कौतुक केलं.

आता जान्हवी अंकिताने दिलेला हॅशटॅग खिलाडू वृत्तीने स्वीकारणार कि घरात यावरून वेगळा राडा होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT