ankita walawalkar  esakal
Premier

Ankita Walawalkar Evicted: अंकिता वालावलकरचा 'बिग बॉस मराठी ५' मधला प्रवास संपला? चाहत्यांना मोठा धक्का

Ankita Walawalkar Evicted From Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी ५ मधून आज अंकिता वालावलकर हीच प्रवास संपला आहे. मात्र पात्र कन्टेस्टंटला काढल्याने नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

Payal Naik

Latest Marathi Entertainment Updates: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मध्ये आज मिड वीक एव्हिक्शन होणार आहे. घरातील सात सदस्यांपैकी एक सदस्य आज घराबाहेर होणार आहे. घरात टॉप ५ किंवा टॉप ६ स्पर्धक राहणार आहेत. मात्र अशातच आता का मोठी धक्कादायक बातमी समोर येते आहे. घरातल्या मिडवीक एव्हिक्शनमध्ये प्रेक्षकांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर झाली आहे. 'बिग बॉस मराठीच्या फॅन पेजकडून ही बातमी देण्यात आली आहे. ही बातमी आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र त्यामुळे बिग बॉस मराठी पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे असं प्रेक्षक म्हणत आहेत. अंकिताच्या एव्हिक्शनने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकण्यासाठी पात्र असणाऱ्या सगळ्यात योग्य स्पर्धकाला घराबाहेर काढल्याने आता प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. मात्र कलर्स मराठीकडून अशी कोणतीही पोस्ट करण्यात आलेली नाही.

ankita walawalkar

या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी ६ स्पर्धक डेंजर झोनमध्ये होते. वोटिंग ट्रेंड्सनुसार या आठवड्यात सुरज, अभिजित आणि अंकिताला सगळ्यात जास्त वोट्स मिळाले होते. तर जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांना सगळ्यात कमी वोट्स आहेत. मात्र असं असूनही मेकर्सनी अंकिताला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अंकिता आता घराबाहेर झाली आहे. मात्र त्यामुळे आता बिग बॉस हा शो आणि त्याचा विनर आधीच ठरलेला आहे असं चित्र आता दिसत आहे असं म्हणत नेटकरी चांगलेच संतापले आहेत. निक्कीला टॉप ३ मध्ये पोहोचवण्यासाठी हा सगळा प्रयत्न मेकर्सकडून करण्यात येत आहे का असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहेत.

अंकिता घराबाहेर झाल्याने आता चाहते मात्र प्रचंड दुखावले गेलेत. यापुढे आपण बिग बॉस पाहणार नाही अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात येत आहेत. बिग बॉस मराठीच्या अनेक फॅन पेजेसने अंकिता बाहेर गेल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde: भाजप सरकारचा स्मार्ट मीटर कायदा अदानींचा फायदा : खासदार प्रणिती शिंदे; जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागणार

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

SCROLL FOR NEXT