Ankita clarifies rumors about student of the year 3 
Premier

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Ankita's team dismisses report of Ankita rejecting SOTTY 3 offer : अभिनेत्री अंकिता लोखंडेने 'स्टुडंट ऑफ द इयर ३' ची ऑफर नाकारल्याच्या बातमीवर तिच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ankita Lokhande : 'बिग बॉस सीजन 17', 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या प्रोजेक्टसमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंकिताला करण जोहरच्या आगामी 'स्टुडंट ऑफ दि इयर 3' या वेबसिरीमध्ये काम करण्याची ऑफर देण्यात आली होती अशी चर्चा होती पण अंकिताने हे वृत्त फेटाळलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अंकिताला ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’ या वेबसिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका ऑफर करणार असल्याची बातमी होती. पण ही निव्वळ अफवा असल्याचं आता स्पष्ट झालंय.

अंकिताने या वेबसिरीजची ऑफर नाकारल्याचं एका मीडिया रिपोर्टने सांगितलं होतं. " हो अंकिताला स्टुडंट ऑफ द इयर 3 या सिरीजमध्ये काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. पण तिची यात काय भूमिका होती आणि या ऑफरचं स्वरूप नेमकं काय होतं हे मला माहित नाहीये. पण तिने ही ऑफर नाकारली असून तिच्या या निर्णयामागचं कारण कोणालाच माहित नाहीये." असं सूत्रांनी सांगितलं होतं.

पण आता अंकिताच्या टीमने हे वृत्त नाकारलं आहे. अंकिताला अशा प्रकारची कोणतीही ऑफर आली नव्हती आणि ती कधीच या प्रोजेक्टचा भाग नव्हती असं अंकिताच्या टीमने म्हंटलं आहे.

दरम्यान वर्क फ्रंटवर अंकिता रणदीप हुडा दिग्दर्शित 'स्वातंत्र्य वीर सावरकर' मध्ये सावरकरांच्या पत्नी 'यमुनाबाई' यांची भूमिका साकारली होती. तिच्या या सिनेमातील अभिनयाचं खूप कौतुक केलं. या सिनेमानंतर तिने तिचा पती विकी जैनसोबत 'ला पिला दे शराब' या गाण्यात एकत्र काम केलं होतं.

अंकिता आता संदीप सिंहच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये शाही गणिकेची भूमिका साकारण्याच्या तयारीत आहे.

'स्टुडन्ट ऑफ द इयर 3' मध्ये दिसणार 'हे' कलाकार

करण जोहरची निर्मिती असलेल्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर 3' या वेबसिरीजमध्ये अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर या सिनेमात काम करणार आहे. शनाया मोहनलाल यांच्या आगामी वृषभा या आगामी सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करणार आहे. ती करणच्या आगामी 'बेधडक' या सिनेमातून पदार्पण करणार असल्याची चर्चा होती पण तसं काही नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. यासोबतच सुहाना खान या सिनेमात काम करणार असल्याची चर्चा आहे. या सोबतच आणखी काही नवीन कलाकार या सीरिजमधून पदार्पण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर अद्याप कारवाई नाहीच; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

Donald Trump : ट्रम्प यांना मोठा झटका! जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशाला न्यायाधीशांची स्थगिती

Wimbledon Women Final: अव्वल मानांकित सबलेंकाला धक्का; अमेरिकेची अमांडा ॲनिसिमोवा अंतिम फेरीत

Satara Crime: 'दोन महिलांना मारहाण करून लुटले'; मॉर्निंग वॉकसाठी जाताना प्रकार, साडेसात तोळे दागिने लंपास

Breakfast Recipe: वीकेंडच्या नाश्त्यासाठी घरी बनवा चविष्ट चीझ गार्लिक ब्रेड, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT