ankush chaudhary sakal
Premier

Ankush Chaudhary: रक्ताचं पाणी करून मुंबई उभी केली आणि आता... अंकुश चौधरीने मांडली व्यथा; म्हणतो-

लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा सुपरस्टार म्हणजे अभिनेता अंकुश चौधरी. त्याने नाटक, मालिका आणि चित्रपट या सगळ्याच मधून स्वतःची छाप पाडली. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘दुनियादारी’, ‘दगळी चाळ’, ‘क्लासमेट’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरु’, ‘ट्रिपल सीट’ अशा अनेक हिट चित्रपटातून अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र आता तो एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकुशने त्याच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे.

एक पोस्ट करत त्याने मुंबईतील भूमिपुत्रांच्या वेदनेला वाचा फोडली आहे. मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच या शहरातून कसं नष्ट होतंय याबद्दल त्याने भाष्य केलं आहे. अंकुशने पोस्ट करत लिहिलं, 'नमस्कार, मी अंकुश चौधरी. गेली पन्नास वर्ष मी या मुंबई शहरात राहतोय. या शहराचा वेग आणि त्याच वेगाने बदलणारं हे शहर मी रोज पाहतोय. याच शहरातल्या गिरणगावात मी लहानाचा मोठा झालो. कॉलेज, नाटक, कट्टा, उत्सव, मॅटर, कॉटर, दोस्ती, यारी, थोडक्यात सांगायचं तर याच गिरणगावात माझी सगळी दुनियादारी.'

पुढे त्याने लिहिलं, 'सांगायची गोष्ट ही की हे शहर बदलतंय आणि यावेळेस फक्त शहर नाही तर सर्वांना सामावून घेण्याची या शहराची मूळ वृत्तीच बदलत आहे. कधी काळी या शहरावर राज्य करणाऱ्या मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललेलं आहे. ज्यांनी आपल्या रक्ताच पाणी करून हे शहर उभ केलं, त्या कामगारांचं अस्तित्वच हे शहर नाकारू लागलंय. या साऱ्याची जाणीव आणि जाणिवेतून येणारी अस्वस्थता माझ्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या वाट्याला येत असेलच.'

पुढे तो म्हणाला, 'एक कलाकार म्हणून ही अस्वस्थता लोकांपर्यत पोहचावी म्हणून या शहराची, शहरातील गिरणगावाची आणि या गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार 'तोडी मिल फॅन्टसी’ हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. २२ जून रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह. सायंकाळी ४:०० वा. राणीबाग भायखळा येथे. या आपल्या शहराची, आपल्या गिरणगावाची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझी खात्री आहे माझ्या या प्रयत्नात तुम्ही मला नक्की साथ द्याल. तुमचा मित्र आणि गिरणगावचा भूमिपुत्र. अंकुश चौधरी'

त्याने प्रेक्षकांना या नाटकाला गर्दी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याच्या पोस्टवर चाहतेही आपलं मत मांडताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT