Annu kapoor on chak de india  esakal
Premier

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Annu kapoor Talked About Chak De India: नॅशनल पुरस्कार विजेते अन्नू कपूर यांनी शाहरुख खान याच्या 'चक दे इंडिया' चित्रपटाबद्दल मोठं विधान केलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Payal Naik

लोकप्रिय अभिनेते अन्नू कपूर यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय. या मुलाखतीत त्यांनी अनेक बेधडक प्रश्न विचारले आहेत. अन्नू कपूर नेहमीच त्यांच्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जातात. आताही त्यांनी एका मुलाखतीत त्यांची स्पष्ट मतं मांडली आहेत. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या 'चक दे इंडिया' या चित्रपटाबद्दल विधान केलं आहे. या चित्रपटात खरं बदलून खोटं दाखवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हे सगळं मुद्दाम केलं गेलं असं त्यांनी म्हटलंय. या चित्रपटात शाहरुखने हॉकी टीमचे कोच कबीर खान यांचं पात्र साकारलं होतं. मात्र हा चित्रपट हिंदू कोच नेगी साहेब यांच्यावर आधारित होता असं अन्नू कपूर यांनी सांगितलं.

काय म्हणाले अन्नू कपूर

अन्नू कपूर यांच्या एका विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत 'चक दे इंडिया' या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हा चित्रोत २००७ मध्ये आला होता. यात शाहरुखने कोच कबीर खान यांचं पात्र साकारलं होतं. या चित्रपटाबद्दल बोलताना अन्नू कपूर म्हणाले, 'हा चित्रपट एक हिंदू कोच नेगी साहेब (मीर रंजन नेगी) यांच्यावर आधारित होता. पण जाणूनबुजून त्याला या चित्रपटात मुस्लिम भूमिकेत दाखवण्यात आलं. भारतात असंच होतं. ते मुस्लिम व्यक्तीला चांगलं दाखवतात, त्यांची छबी चांगली दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि एका पंडित व्यक्तीची थट्टा उडवतात. त्यानंतर त्यावर एक लेबल लावणार की गंगा- जमुना एक है. म्हणजे भारतात हिंदू मुस्लिम एकता कशी टिकून राहिली पाहिजे याबद्दल बोलू लागतात.'

2007 चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

'चक दे इंडिया' रिलीपण या चित्रपटाची गाणी आणि पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. कबीर खानच्या भूमिकेत शाहरुख खान अगदी परफेक्ट होता आणि त्याचं यासाठी खूप कौतुक झालं होतं. हा 2007 चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharia law : 'सत्तेत आल्यास देशात शरिया कायदा लागू करणार, हिंदूंसह मुस्लिमांना देणार अधिकार'; फैजुल करीम यांचं वादग्रस्त विधान

Shaktipeeth Highway : सतेज पाटील, राजू शेट्टींचे ‘शक्तिपीठ’विरोधात विठ्ठलाला साकडे

Ashadhi Wari 2025 : पुण्याहून पंढरपूरसाठी ३२५ अतिरिक्त बस, गाड्या शनिवारी, रविवारी धावणार; नियंत्रण कक्ष स्थापन

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

SCROLL FOR NEXT