Jitendra Awhad  sakal
Premier

Jitendra Awhad: 'हमारे बारह' चित्रपटाला जितेंद्र आव्हाडांकडून विरोध; कारण काय? जाणून घ्या

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी 'हमारे बारह' या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

priyanka kulkarni

Hamare Baarah: ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांचा चित्रपट 'हमारे बारह' (Hamare Baarah) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिग्दर्शक कमल चंद्रा यांच्या या चित्रपटात अन्नू कपूर (Annu Kapoor) यांच्यासोबतच पार्थ समथान, अश्विनी काळसेकर आणि परितोष तिवारी या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. काही दिवसांनी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. पण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वाद निर्माण झाला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. जितेंद्र अव्हाड यांनी नुकतेच 'हमारे बारह' या चित्रपटाबाबत एक ट्वीट (X) शेअर केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट शेअर करुन 'हमारे बारह' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, "लवकरच प्रदर्शित होणारा 'हमारे बारा' हा चित्रपट पवित्र कुराणचा विपर्यास करून इस्लामचा अपमान करण्याच्या एकमेव उद्देशाने बनवला आहे. इस्लाम धर्म त्यांच्या अनुयायांना किती मुले असावीत? याचा सल्ला देत नाही. अधिक मुले असणे ही एक सामाजिक आर्थिक समस्या आहे. ही समस्या धार्मिक उपदेश नाहीये. अनेक इस्लामिक धर्म नसणाऱ्या राजकीय नेत्यांना 8/10 मुले होती."

"हा चित्रपट जातीय तणाव निर्माण करू शकतो. हा चित्रपट केवळ धार्मिक फूट आणि द्वेषासाठी तयार केला जात आहे. त्यावर तात्काळ बंदी घातली पाहिजे कारण चुकीचा अर्थ दाखवल्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप पसरू शकतो.वस्तुस्थिती न तपासता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला मंजुरी प्रमाणपत्र कसे दिले?", असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

कधी रिलीज होणार 'हमारे बारह'?

'हमारे बारह' हा चित्रपट 7 जून रोजी रिलीज होणार आहे.या चित्रपटात एका मुस्लिम कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT