anurag kashyap esakal
Premier

Anurag Kashyap: "मला भेटायचं असेल तर 15 मिनिटांसाठी एक लाख आणि एक तासासाठी..."; अनुराग कश्यपच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Anurag Kashyap: अनुरागनं न्यू कमर्सबाबत तसेच त्याला भेटायला येणाऱ्या लोकांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Anurag Kashyap: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. अनुरागचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अनुराग अनेक न्यू कमर्सला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी देतो, अशातच आता अनुरागनं न्यू कमर्सबाबतीत तसेच त्याला भेटायला येणाऱ्या लोकांच्याबाबतीत एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अनुरागची पोस्ट

अनुरागनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "मी न्यू कमर्सला मदत करण्याचा प्रयत्न करुन स्वत:चा बराच वेळ वाया घालवला आहे. त्यामुळे आता यापुढे मी माझा वेळ कोणत्याही लोकांना भेटण्यात वाया घालवू इच्छित नाही, ज्यांना वाटते की ते खूप क्रिएटिव्ह आहेत. त्यामुळे मी आता काही दर ठरवले आहेत.जर कोणाला मला भेटायचे असेल तर मी 10-15 मिनिटांसाठी एक लाख घेणार, अर्ध्या तासासाठी 2 लाख आणि 1 तासासाठी 5 लाख रुपये घेणार. मी वेगवेगळ्या लोकांना भेटून थकलो आहे. तुम्हाला जर हे दर परवडत असतील तर मला कॉल करा आणि मी पैसे अॅडव्हान्स घेणार आहे."

"आणि मला मेसेज किंवा कॉल करू नका. पैसे द्या आणि माझा वेळ घ्या. मी चॅरटी करायला नाहीये. मी आता शॉर्टकट शोधणाऱ्या लोकांना कंटाळलो आहे.", असंही अनुरागनं पोस्टमध्ये लिहिलं.

अनुरागच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

नेटकऱ्यांनी अनुरागच्या या हटके पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं अनुरागच्या पोस्टला कमेंट केली, "ही तुझ्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनची स्क्रिप्ट आहे का?" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "सर, लोनसाठी अप्लाय करुन तुमच्यासोबत बोलतो."

अनुरागचे चित्रपट

अनुरागनं दिग्दर्शित केलेल्या ब्लॅक फ्रायडे, देव डी, गुलाल, दॅट गर्ल ईन यलो बुट्स आणि गॅंग्स ऑफ वासेपूर या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.एके वर्सेस एके या चित्रपटात अनुरागनं काम देखील केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT