Bhushan Pradhan esakal
Premier

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Bhushan Pradhan: भूषणचं नाव सध्या एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. ही अभिनेत्री कोण आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Bhushan Pradhan: अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) हा मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. भूषण हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. काही दिवसांपूर्वी त्याचा जुनं फर्निचर (Juna Furniture) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामुळे सध्या भूषण चर्चेत आहे. चित्रपटाबरोबरच भूषण हा त्याच्या अभिनयामुळे देखील चर्चेत आहे. भूषणचं नाव सध्या एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. ही अभिनेत्री कोण आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

'या' अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय भूषणचं नाव

भूषणचा आणि अभिनेत्री अनुषा दांडेकरचा (Anusha Dandekar) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनुषा आणि भूषण हे रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अशातच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी भूषणचं नाव अनुषासोबत जोडत आहेत. भूषण आणि अनुषा हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सध्या होत आहेत.

नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

भूषण आणि अनुषा दांडेकर यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "तुम्ही दोघे क्युट दिसत आहात, लवकर लग्न करा!" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "made for each other"

पाहा व्हिडीओ:

भूषण आणि अनुषा यांनी जुनं फर्निचर या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अनुषानं भूषणच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. काही वर्षांपूर्वी अनुषा ही अभिनेता करण कुंद्राला डेट करत होती. पण करण आणि अनुषाचा ब्रेकअप केला. आता अनुषाचं नाव भूषणसोबत जोडलं जात आहे तर करण हा सध्या तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT