Anushka Sharma Post  sakal
Premier

Anushka Sharma: भारताच्या विजयानंतर वडिलांना रडताना पाहून वामिकाचा भाबडा प्रश्न; अनुष्का शर्माने शेअर केली खास पोस्ट

T20 World Cup: टीम इंडियाच्या विजयानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने खास पोस्ट शेअर केली आहे.

Payal Naik

भारतीय संघाने दमदार कामगिरी करत गेल्या १३ वर्षाची प्रतीक्षा संपवली. भारतीय संघाने ७ धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं. २०२४ आयसीसी विश्वचषक भारताने आपल्या नावावर केला. या विजयानंतर सगळीकडे एकच आनंदाची लाट आली. क्रिकेटच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर सर्व स्तरावर एकाच जल्लोष करण्यात आला. त्यानंतर अनेक चाहते आणि कलाकारांनी खेळाडूंचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या. त्यातच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने विराटसाठी केलेली पोस्टही सध्या चर्चेत आहे.

अनुष्काने या पोस्टमध्ये तिच्या मुलीने वामिकाने रडणाऱ्या क्रिकेटर्सना पाहून विचारलेला प्रश्न सांगितला आहे. अनुष्काने लिहिलं, 'आमच्या मुलीने आज सामना संपल्यावर या सगळ्या खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिलं. यावेळी ‘या’ खेळाडूंना धीर देण्यासाठी तिथे कोणी असेल का’ असा प्रश्न तिने विचारला. मी तिला म्हणाले, हो डार्लिंग… कारण, आज जवळपास १.५ बिलियन प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंना मिठी मारली आहे. आपल्या टीमने अभूतपूर्व विजय मिळवला आणि सगळ्यांनी या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स – अभिनंदन!'

त्यानंतर तिने दुसरी पोस्ट विराट कोहलीची केली आहे. ही पोस्ट करत तिने लिहिलं, 'माझं या माणसावर खूप प्रेम आहे. विराट कोहली… तू माझा आहेस हे सांगताना मला प्रचंड आनंद होतो. आता हा आनंद साजरा करण्यासाठी माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये.' अनुष्काची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. तर चाहते तिच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT