Appi Aamchi Collector esakal
Premier

Appi Aamchi Collector: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराज केंद्रेची 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Appi Aamchi Collector: साईराज आता 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

priyanka kulkarni

Appi Aamchi Collector: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' (Amchya Pappani Ganpati Anala) या गाण्यामुळे चिमुरड्या साईराजला रातोरात प्रसिद्धी मिळाली. कमाल एक्सप्रेशन्स आणि तितक्याचं सुंदर डान्समुळे घराघरात पोहोचलेला साईराज केंद्रे (Sairaj Kendre) आता झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आणि साईराजची या मालिकेतील भूमिका कळल्यावर सगळेजण खुश झाले.

झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत साईराज अप्पी आणि अर्जुनच्या मुलाची अमोलची भूमिका साकारतोय. मालिकेत आता काही वर्षांचा लीप दाखवण्यात येणार आहे. मालिकेच्या मागील काही भागांमध्ये दाखवण्यात आलं की, अर्जुनच्या आई विषयीचे सत्य अप्पीने लपवून ठेवल्यामुळे अर्जुन तिला सोडून गेलाय पण जाताना त्याने अमोलला त्याच्याविषयी काहीच कळलं नाही पाहिजे असं वचन तिच्याकडून घेतलंय.

मालिकेच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमो मध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय. कलेक्टर म्हणून अपीची बदली उत्तराखंडला झाली असून तिच्या कामाचं तिथे खूप कौतुक होतंय अपी अमोलला घेऊन मंदिरात दर्शनासाठी जाते ती अमोलला तिथेच थांबवून प्रदक्षिणा घालत असते तेव्हा अर्जुन तिथे येतो अमोलला देवळातील घंटा वाजवायची असते त्याची धडपड पाहून अर्जुन अमोलला मदत करतो आता आप्पे आणि अर्जुन समोरासमोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना आवडला असून अनेकांनी कमेंट करत साईराजवर शुभेच्छांचा वर्षाव केला. 1 मे 2024 पासून साईराज या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तेव्हा पाहायला विसरू नका अप्पी आमची कलेक्टर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त झी मराठीवर.

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, साईराजचं पूर्ण नाव साईराज केंद्रे असं असून सोशल मीडियावरील रीलमुळे तो प्रसिद्ध झाला. त्याने डान्स केलेलं माझ्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं मूळ माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी गायलं आहे. परंतु, या गाण्यावरचा साईराजचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आणि त्याला प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT